पहिला बहादूर शाह
बहादूर शाह पहिला (तुर्की: Bahadır Şah, फारसी: بہادر شاه Bahādur Shāh) (१४ ऑक्टोबर, इ.स. १६४३:बुरहानपूर – २७ फेब्रुवारी, इ.स. १७१२:लाहोर) हा एक मुघल सम्राट होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा म्हणून तो १७०७ मध्ये मुघल साम्राज्याच्या गादी वर बसला. त्याने इ.स. १७०७ ते इ.स. १७१२ दरम्यान भारतावर राज्य केले. यालाच मुअज्जम किंवा शाह आलम पहिला या नावांनीही ओळखले जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुअज्जम आणि औरंगजेबाचा दुसरा मुलगा मोहम्मद आज्जम यांच्यात सामुगढ जवळील जाजाऊ येथे लढाई होऊन त्यात मुअज्जम विजयी ठरला.
बहादूर शाह पहिला | ||
---|---|---|
बादशाह | ||
अधिकारकाळ | इ.स. १७०७ - इ.स. १७१२ | |
अधिकारारोहण | जून १९, इ.स. १७०७ | |
राजधानी | दिल्ली | |
पूर्ण नाव | कुतुबुद्दीन मोहम्मद मुअज्ज्म | |
जन्म | १४ ऑक्टोबर १७४३ | |
बुऱ्हाणपूर | ||
मृत्यू | २७ फेब्रुवारी १८१२ | |
लाहोर | ||
पूर्वाधिकारी | औरंगजेब | |
उत्तराधिकारी | जहांदार शाह | |
वडील | औरंगजेब | |
आई | नवाब बाई | |
राजघराणे | मुघल |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |