लाहोर
लाहोर (पंजाबी: ਲਹੌਰ; उर्दू: لاہور) ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाहोर पाकिस्तानच्या पूर्व भागात रावी नदीच्या काठावर वसले असून ते भारत-पाकिस्तानच्या वाघा सीमेपासून २२ किमी तर अमृतसरपासून केवळ ४२ किमी अंतरावर स्थित आहे. दक्षिण आशियामधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले लाहोर हे पंजाबी लोक स्थानिक असलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे. पंजाब प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी मानले जात असलेले लाहोर आर्थिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.
लाहोर لاہور |
|
पाकिस्तानमधील शहर | |
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
क्षेत्रफळ | १,७७२ चौ. किमी (६८४ चौ. मैल) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | ९६ लाख |
- महानगर | १.२५ कोटी |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
लाहोर १६व्या शतकामध्ये मोगल साम्राज्याचे, इ.स. १८०२ ते १८४९ दरम्यान शीख साम्राज्याचे तर ब्रिटिश राजवटीमध्ये पंजाब प्रांताची राजधानी होती. येथील बादशाही मशीद, लाहोर किल्ला, शालिमार बागा इत्यादी स्थाने जगप्रसिद्ध आहेत.
वाहतूक
संपादनकराची-पेशावर रेल्वे मार्गावर असलेले लाहोर रेल्वे स्थानक हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. लाहोरहून समझौता एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या सुटतात. अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लाहोरमधील प्रमुख विमानतळ असून येथे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचा हब आहे.
खेळ
संपादनक्रिकेट हा लाहोरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून येथील गद्दाफी स्टेडियममध्ये १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला होता.
बाह्य दुवे
संपादन- महिती
- विकिव्हॉयेज वरील लाहोर पर्यटन गाईड (इंग्रजी)