वाघा
वाघा हे पाकिस्तानातील लाहोर सिटी डिस्ट्रिक्ट जवळील वाहगा झोनमध्ये स्थित एक गाव आहे. [१] हे शहर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाघा - अटारी सीमासाठी प्रसिद्ध आहे. इथे माल वाहतूक टर्मिनल आणि रेल्वे स्थानक पण आहे. [२] वाहगा हे पाकिस्तानातील लाहोर व भारतातील अमृतसर दरम्यानच्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर वसलेले आहे. हे लाहोर पासून २४ किलोमीटर (१५ मैल) आणि अमृतसर पासून ३२ किलोमीटर (२० मैल) अतंरावर आहे. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेपासून ६०० मीटर (२,००० फूट) अंतरावर आहे. इथून भारतातील जवळचे गाव अटारी हे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर आहे.
-
वाघा बॉर्डरवर 122 मीटर उंच पाकिस्तानी ध्वज
-
सीमेच्या पाकिस्तानी बाजूस स्टेडियमसारखी आसनव्यवस्था
-
सीमेवर पाकिस्तानी गेट
-
बाब-ए-आझादी (स्वातंत्र्य द्वार) वाघा बॉर्डरच्या पाकिस्तानी बाजूने
-
वाघा येथे भारतीय बीएसएफ
-
वाघा येथे भारतीय बीएसएफच्या महिला कर्मचारी
-
वाघा येथे पंजाब रेंजर्स
-
वाघा बॉर्डरजवळचा मैलाचा दगड
-
वाघा सीमेजवळ भातशेती
a border town in the Pakistani province of Punjab | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | border checkpoint | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | भारत-पाकिस्तान सीमा | ||
स्थान | Lahore District, Lahore Division, पंजाब, पाकिस्तान | ||
Located in/on physical feature | Pothohar Plateau | ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ The Punjab Gazette
- ^ "Mixed feelings on India-Pakistan border". BBC News. 14 August 2007.