समझौता एक्सप्रेस
|
समझौता एक्सप्रेस (उर्दू: سمجھوتا اکسپريس) ही भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणारी एक प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी भारतीय राजधानी दिल्लीला अमृतसरमार्गे पाकिस्तानधील लाहोर शहरासोबत जोडते. भारतीय रेल्वेची दिल्लीहून सुटणारी गाडी भारत-पाकिस्तान सीमेजवळ अटारी गावापर्यंतच धावते. येथे सर्व प्रवाशांना उतरून कस्टम व इमिग्रेशन[मराठी शब्द सुचवा] पूर्ण करावे लागते. त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवल्या जात असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावे लागते. ती वेगळी गाडी लाहोरपर्यंत धावते.
सिमला करारात ठरल्याप्रमाणे ह्या रेल्वे प्रवासाचा २२ जुलै १९७६ रोजी प्रारंभ करण्यात आला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांचा फटका ह्या सेवेला बसत असून आजवर अनेकदा ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.