फेब्रुवारी २७
दिनांक
(२७ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसोळावे शतक
संपादन- १५६० - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रान्सला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- १५९४ - हेन्री चौथा फ्रान्सच्या राजेपदी.
अठरावे शतक
संपादन- १७०० - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०१ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आले.
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
- १८५४ - झांसी संस्थानच्या राजा गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करीत ईस्ट इंडिया कंपनीने संस्थान ताब्यात घेतले.
- १८७९ - सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
विसावे शतक
संपादन- १९०० - ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
- १९१२ - वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म.
- १९३३ - जर्मनीच्या संसदभवनाला आग लागली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचे विमानवाहू जहाज यू.एस.एस. लॅंगली बुडवले.
- १९४३ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
- १९५१ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
- १९६३ - हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी आले.
- १९६७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८९ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
- १९९१ - कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
- १९९८ - मुंबईमधील कांदिवली व विरार रेल्वे स्थानंकांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ३ ठार .
- १९९९ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या आकाश या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
- २००२ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
- २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,०००हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
- २००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
- २००७ - शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
- २०१० - चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
जन्म
संपादन- २७२ - कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट.
- १८०७ - हेन्री वॅड्सवर्थ लॉंगफेलो, इंग्लिश कवि.
- १८६० - वैजनाथ काशिनाथ राजवाडे, संस्कृत पंडित
- १९०२ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- १९०६ - माल मॅथिसन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
- १९१२ - कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
- १९२० - रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - नॉर्मन मार्शल, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९२६ - ज्योत्स्ना देवधर, मराठी व हिंदी लेखिका.
- १९२८ - एरियेल शरोन, इस्राइलचे पंतप्रधान.
- १९३४ - राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
- १९३९ - लेस्टर किंग, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - ऍशली वुडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - संदीप सिंग, भारतीय हॉकी खेळाडू.
मृत्य
संपादन- १९२१ - शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९४७ - एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - गणेश वासुदेव मावळणकर, भारतीय वकील आणि राजकारणी.
- १९७६ - के.सी. रेड्डी, कर्नाटकचे प्रथम मुख्यमंत्री तथा मध्य प्रदेशचे राज्यपाल.
- १९८७ - अदी मर्झबान, हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार व संपादक.
- १९९७ - श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर, हिंदी चित्रपट गीतकार.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- मराठी भाषा गौरव दिन (कुसुमाग्रजांचा जन्म दिन)
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक.
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिका.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)