ज्योत्स्ना देवधर

(ज्योत्स्‍ना देवधर या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्योत्स्ना देवधर (जन्म : जोधपूर, २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६[], - पुणे, १७ जानेवारी, इ.स. २०१३) ह्या मराठी तसेच हिंदी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिका होत्या.

ज्योत्स्ना देवधर
जन्म २७ फेब्रुवारी, इ.स. १९२६ []
जोधपूर, राजस्थान, भारत
मृत्यू १७ जानेवारी, इ.स. २०१३
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

ज्योत्स्ना देवधर यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर वर्धा येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या.

ज्योत्स्ना देवधर यांनी ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहापासून त्यांनी साहित्य लेखनास सुरुवात केली. ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली.

ज्योत्स्ना देवधर यांचे लेखन स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. त्यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दुःखे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.[]

त्यांनी लिहिलेले 'पंडिता रमाबाईंचे चरित्र' हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे.

त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि इस्लामिया विद्यापीठ या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदी आणि इंग्लिश भाषेत अनुवाद झाले आहेत.

ज्योत्स्ना देवधर या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या होत्या.[]

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अट कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
अंतरा हिंदी कथासंग्रह
आकाशी सायली प्रकाशन
आक्रीत नवचैतन्य प्रकाशन
आजीची छडी गोड गोड बालवाङ्‌मय
आठवणींचे चतकोर ललित सायली प्रकाशन
आंधळी कोशिंबीर कथासंग्रह नवचैतन्य
उणे एक कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
उत्तरयोगी (योगी अरविंद यांच्या जीवनावरील) कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
उणे एक कादंबरी
उद्ध्वस्त कथासंग्रह दिलीपराज
एक अध्याय कादंबरी
एक श्वास आणखी कादंबरी नंदादीप
एरियल आकाशवाणीचा रंजक इतिहास आत्मकथन मेनका
कॅक्टस हिंदी कथासंग्रह
कडेलोट कादंबरी
कल्याणी हिंदी व मराठी कादंबरी पॉप्युलर
कल्याणी नाटक पॉप्युलर
काळजी ऐतिहासिक नवचैतन्य
कुॅंवरनी हिंदी कादंबरी नंदादीप
घरगंगेच्या काठी कादंबरी पॉप्युलर
गजगे कथासंग्रह
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या कथासंग्रह
चुकामूक कादंबरी
चेहरा आणि चेहरे ललित नवचैतन्य प्रकाशन
झरोका कथासंग्रह
तेजस्विनी बाल वाङमय नवचैतन्य प्रकाशन
दंवबिंदू कथासंग्रह श्रीकल्प प्रकाशन
दीर्घा कथासंग्रह दीपरेखा प्रकाशन
धुम्मस हिंदी कथासंग्रह
निर्णय नाटक नीलकंठ प्रकाशन
निवडक ज्योत्स्ना देवधर सायली प्रकाशन
निवान्त कथासंग्रह दिलीपराज
पडझड कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
पांघरुण कथा संग्रह सायली प्रकाशन २००९
पुतळा कादंबरी
फिलर कथासंग्रह
बुटक्या सावल्या कादंबरी
बोंच कथासंग्रह अभिनंदन प्रकाशन
मधली भिंत कथा संग्रह पायल पब्लिकेशन्स
मावळती ललित
मिसफिट कथासंग्रह
मूठभर माणुसकी ललित नवचैतन्य प्रकाशन
याचि जन्मी नवचैतन्य प्रकाशन
यामिनीकथा अनुवादित, कथासंग्रह नवचैतन्य
रमाबाई चरित्र पॉप्युलर प्रकाशन २००८
रमा बाई(हिंदी) चरित्र लोकभारती प्रकाशन १९९६
विंझणवारा कथा संग्रह अक्षता फेब्रु. २००९
समास कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
सात घरांच्या सीमारेषा कथासंग्रह दिलीपराज
सायली कथासंग्रह
हो नाहीच्या उंबरठ्यावर कादंबरी पायल पब्लिकेशन्स

पटकथा आणि संवादलेखन

संपादन
  • ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटासाठी
  • ‘कल्याणी’ या दूरचित्रवाणीमालिकेसाठी
  • ‘पडझड’ या दूरचित्रवाणी मालेकेसाठी.

ज्योत्स्ना देवधर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • घर गंगेच्या काठी या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा हरी नारायण आपटे पुरस्कार.
  • कॅक्टस हा हिंदी कथासंग्रह, निर्णय हे पुरुषपात्रविरहित मराठी नाटक आणि ‘रमाबाई’ ही मराठी कादंबरी या त्यांच्या साहित्यकृती पुरस्कारप्राप्त ठरल्या.
  • महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे मराठी ग्रंथालय यांचा ‘ज्येष्ठ लेखिका सन्मान’.
  • अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनतर्फे ‘भाषाभूषण’ ही पदवी
  • महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे ‘कल्याणी’ या हिंदी नाटकास ‘विष्णूदास भावे पुरस्कार’.
  • कराड येथे १९७५ मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद.
  • अंबाजोगाई येथील भरलेल्या जिल्हा महिला परिषदेचे अध्यक्षपद.
  • महाराष्ट्र राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सभासदत्व.
  • महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार निवड समितीवर सभासद म्हणून निवड.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदचंद्र चटर्जी पुरस्कार. []

संदर्भ

संपादन
  1. ^ a b दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. ७०.
  2. ^ "मनसे.ऑर्ग". 2011-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.
  3. ^ "साहित्यप्रेमी भगिनी मंडळ". 2009-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-11 रोजी पाहिले.
  4. ^ ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत शरदबाबू पुरस्कार[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन