के. चेंगलराया रेड्डी

भारतीय राजकारणी
(के.सी. रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

कायसंबल्ली चेंगलुराया रेड्डी (४ मे, १९०२:कायसंबल्ली, कोलार जिल्हा, कर्नाटक - २७ फेब्रुवारी, १९७६) हे म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक) पहिले मुख्यमंत्री होते. नंतर ते मध्य प्रदेशचे तिसरे राज्यपाल झाले.

के. चेंगलराया रेड्डी

जन्म ४ मे, १९०२ (1902-05-04)
मृत्यू २७ फेब्रुवारी, १९७६ (वय ७३)

रेड्डी यांचा जन्म वोक्कलिगा [] [] [] कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच बंडखोर होते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. [] []

कायद्याची पदवी घेतल्यानंतर, रेड्डी यांनी इतर राजकीय कार्यकर्त्यांसह १९३० मध्ये प्रजा पक्षची स्थापना केली. म्हैसूर संस्थानात जबाबदार सरकार स्थापन करणे हा या पक्षाचा उद्देश होता. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळे पक्षाला ग्रामीण भागात पाठिंबा मिळाला. प्रजा पक्ष आणि प्रजा मित्र मंडळी यांनी १९३४ मध्ये प्रजा संयुक्त पक्ष (म्हैसूर पीपल्स फेडरेशन) ची स्थापना केली. १९३५ ते १९३६ दरम्यान रेड्डी याचे अध्यक्ष होते.[] यानंतर हा संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाला. [] रेड्डी हे १९३७-३८ आणि १९४६-४७ असे दोनदा म्हैसूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्यही होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ KC Reddy's 117th birth anniversary: Karnataka celebrates first chief minister.
  2. ^ Shankaragouda; Hanamantagouda Patil (2002). Community Dominance and Political Modernisation: The Lingayats. Mittal Publications. p. 353. ISBN 9788170998679. There are three chief ministers from Vokkaliga community (Sarvashri K.C. Reddy, K. Hanumathaiah and Kadidal Maniappa) between 1947 and 1956 in the Mysore state. The Vokkaligas dominated the politics of Mysore state during this period.
  3. ^ G. Narayana Reddy (1986). Rural Elite and Community Work: A Socio Political Perspective. Chugh Publications. p. 80. ISBN 9788185076034. Till 1956, most of the rural Mysore was dominated by Vokkaligas and the three Chief Ministers (K.C. Reddy, Hanumathaiah and Kodidal Manjappa) were also Vokkaligas.
  4. ^ "K.C. Reddy | Chief Minister of Karnataka | Personalities". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2013-05-07. 2018-08-04 रोजी पाहिले.
  5. ^ "K. Chengalaraya Reddy – The Pioneer Politician". reddysociety.com. 6 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 August 2018 रोजी पाहिले.
  6. ^ Community dominance and political modernisation: the Lingayats – Shankaragouda Hanamantagouda Patil – Google Books
  7. ^ "Chapter I1 Trajectories of Development: History and Spatiality" (PDF).