फेब्रुवारी १
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२ वा किंवा लीप वर्षात ३२ वा दिवस असतो.
ठळक घटना
संपादनसतरावे शतक
संपादन- १६६२ - ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले.
अठरावे शतक
संपादन- १७९० - न्यू यॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.
- १७९३ - फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१४ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
विसावे शतक
संपादन- १९०८ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
- १९१२ - कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची "चाफा " ही कविता मनोरंजन मासिकात प्रसिद्ध झाली.
- १९२० - कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलीस संघटनेची स्थापना.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
- १९४६ - नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.
- १९६२ - मराठा रेजिमेंट सिक्सची स्थापना
- १९७४ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
- १९७९ - रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
- १९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
- १९९१ - लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसऱ्या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार.
- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
- २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
- २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
जन्म
संपादन- १८८१ - टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
- १९०१ - क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.
- १९०४ - बाबूराव घोलप , शिक्षणमहर्षी
- १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - राजा नीलकंठ बढे, मराठी कवी.
- १९२२ - क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - म. द. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक.
- १९२९ - जयंतराव साळगावकर, ज्योतिषी, कालनिर्णयकार
- १९३० - शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - अरुण टिकेकर, मराठी पत्रकार.
- १९५० - नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९६५ - डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३२८ - चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.
- १५६३ - मेनास, इथियोपियाचा सम्राट.
- १६९१ - पोप अलेक्झांडर आठवा.
- १७३३ - ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.
- १९०८ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १९८१ - डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
- २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर -
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शेती तंत्रज्ञान प्रसार दिन
- तटरक्षक दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - (फेब्रुवारी महिना)