अरुण टिकेकर

भारतीय लेखक आणि पत्रकार

अरुण चिंतामण टिकेकर (जन्म : १ फेब्रुवारी १९४४; - १९ जानेवारी २०१६) हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. माधव गडकरी यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. त्यापूर्वी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते. त्याच सुमारास ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते. नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले.

अरुण टिकेकर
जन्म १ फेब्रुवारी १९४४
मृत्यू १९ जानेवारी २०१६
वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर

टिकेकरांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे लोकमान्य टिळकांच्या केसरीत धनुर्धारी या टोपणनावाने सदर लिहित. ते केसरीचे पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ. य.दि. फडके यांनी केला होता. टिकेकर यांचे काका श्रीपाद रामचंद्र टिकेकर हे मुसाफिर टोपणनावाने लिहीत तर वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर हे दूत या टोपणनावाने लिहीत. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आण‌ि टोपणनावे यात टिकेकरांना विशेष रस होता. स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत.

टिकेकर पुढे सकाळ ग्रुप या वृत्तपत्र संघाचे संपादकीय संचालक झाले

टिकेकरांनी अनेक सदरलेखकही घडवले. त्यांना इंग्लिश साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून ओळखले जाते.

अरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांनी The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service या नावाचा शोधप्रबंध लिहिला होता.

त्यांच्या लोकसत्तेतील तारतम्य ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे ते तारतम्यकार म्हणून परिचित झाले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते.

पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध.
  • इति-आदि (दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास)
  • Indo - British Encounter (मूळ इंग्रजी, लेखक : आर.बी. पाटणकर, संपादन - अरुण टिकेकर आणि अशोक जोशी)
  • ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची.
  • ओच्या कोच्या (प्रवासवर्णन)
  • कालचक्र (सदर-लेखसंग्रह)
  • काल मीमांसा.
  • कालांतर (लेखसंग्रह)
  • Collaborators Or Conformists - मुंबईतील इंग्रजी वर्तमानपत्रांच्या ब्रिटिश संपादकांविषयीचे पुस्तक.
  • The Cloister’s Pale (इंग्रजी)
  • The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन - अरुण टिकेकर)
  • Power Pen And Patronage (इंग्रजी)
  • Founders and Gurdianas of The Asiatic Society Of Mumbai : ALEXANDER KINLOCH FORBES (इंग्रजी, मूळ लेखक दीपक मेहता, संपादक - अरुण टिकेकर)
  • फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
  • मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
  • Mumbai De-Intellectualised : Rise and Decline of a Culture of Thinking. (इंग्रजी)
  • रानडे प्रबोधन-पुरुष
  • SIR GEORGE BIRDWOOD (इंग्रजी, मूळ लेखिका विजया गुपचुप, संपादन - अरुण टिकेकर)
  • स्थल काल (सदर-लेख संग्रह)
  • स्पर्धा काळाशी... (मूळ लेखक - शरद पवार, अनुवाद आणि संपादन - अरुण टिकेकर)

पुरस्कार

संपादन
  • एकमत पुरस्कार.
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, []
  • जीवनगौरव पुरस्कार समितीचे अध्यक्षपद.
  • दिल्ली येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील मराठी वाङ्मय विभागाचे संपादक.
  • अरुण टिकेकर यांच्या नावाने मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने 'डाॅ. अरुण टिकेकर प्रगत अभ्यास केंद्र' स्थापन केले आहे. हे केंद्र इ.स.२०१७ सालापासून सांस्कृतिक विषयात संशोधन क्षेत्रात काम करणारे अभ्यासक वा विद्यार्थी यांना दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी 'डाॅ. टिकेकर अभ्यासवृत्ती' देते.

बाह्य दुवे

संपादन

http://www.bhashaindia.com/Patrons/IndicIT/Marathi/AroonTikekar.htm?lang=mr[permanent dead link]

संदर्भ

संपादन