होलोकॉस्ट

(ज्यूंचे शिरकाण या पानावरून पुनर्निर्देशित)

होलोकॉस्ट (ग्रीकः ὁλόκαυστος होलोकाउस्तोस ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून करण्यात आलेल्या ज्यू लोकांच्या हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपात सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी दोन तृतीयांश (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत ज्यूविरोधाची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची योजना आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये (इंग्लिश: Concentration camps) डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारुण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. डखाउ, बुखनवाल्ड, आउश्वित्झ ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने पूर्व युरोपातील देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.

१९४२ साली ज्यूंच्या सामूहिक कत्तलीसाठी संहारछावण्या[]उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.

शब्दाची पार्श्वभूमी आणि वापर

संपादन

होलोकॉस्ट हा शब्द ὁλόκαυστος (उच्चार: होलोकास्तोस) या ग्रीक भाषेतील शब्दावरून बनला आहे. प्राचीन ग्रीकोरोमन संस्कॄतीत देवाला बळी म्हणून वाहिला जाणारा प्राणी पूर्णपणे जाळला जाई, त्याप्रमाणे झालेला एखाद्याचा पूर्ण संहार असा अर्थ या शब्दातून व्यक्त होतो. इंग्लिश भाषेत मोठ्या प्रमाणात झालेल्या नरसंहारासाठी "होलोकॉस्ट" हा शब्द अनेक वर्षे वापरला गेला आहे. परंतु इ.स. १९६० सालापासून ह्या शब्दाचा संदर्भ पालटून तो दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंच्या शिरकाणापुरत्या सीमित अर्थानेच वापरला जातो.

घडामोडी

संपादन

सामाजिक बांधणी

संपादन

मिखाएल बेरेन्बाउम याच्यानुसार "जर्मनी एक 'वांशिक बळीचे राज्य' बनले". पॅरिश चर्च आणि मंत्रिमंडळे यांनी कोण ज्यू आहेत, हे समजण्यासाठी जन्मदाखले पुरवले.

मृत्युसंख्या

संपादन

विविध इतिहासकारांनुसार होलोकॉस्टच्या अनेक व्याख्या आहेत. बरेच जाणकार होलोकॉस्टमध्ये ज्यूंसोबत इतर वर्णाच्या लोकांचा समावेश करतात ज्यांची देखील नाझी जर्मनीकडून हत्या केली गेली. ह्या सर्व वर्णांच्या व पेशाच्या लोकांसह होलोकॉस्टची मृत्यूसंख्या २ कोटीच्या घरात जाते.

बळी मृत संदर्भ
ज्यू ५९ लाख []
सोव्हिएत युद्धकैदी २० ते ३० लाख []
पोलिश लोक १८ ते २० लाख [][]
रोमानी लोक २.२ ते १५ लाख [][]
अपंग २ ते २.५ लाख []
गुप्त कारागीर ८० हजार []
स्लोव्हेन २० ते २५ हजार [१०]
समलिंगीं संबंध ठेवणारे ५ ते १५ हजार [११]
जेहूव्हाचे साक्षीदार २.५ ते ५ हजार [१२]

खालील यादीत युरोपातील देशांमधील दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या ज्यू लोकांची संख्या व होलोकॉस्ट दरम्यान गतप्राण झालेल्या ज्यूंची संख्या दर्शवली आहे.

देश युद्धापूर्वी अंदाजे
ज्यू लोकसंख्या
अंदाजे गतप्राण टक्के
पोलंड ३३,००,००० ३०,००,००० ९०
बाल्टिक देश २,५३,००० २,२८,००० ९०
जर्मनीऑस्ट्रिया २,४०,००० २,१०,००० ९०
बोहेमियामोराव्हिया ९०,००० ८०,००० ८९
स्लोव्हाकिया ९०,००० ७५,००० ८३
ग्रीस ७०,००० ५४,००० ७७
नेदरलँड्स १,४०,००० १,०५,००० ७५
हंगेरी ६,५०,००० ४,५०,००० ७०
सोव्हिएत बेलारूस ३,७५,००० २,४५,००० ६५
सोव्हिएत युक्रेन १५,००,००० ९,००,००० ६०
बेल्जियम ६५,००० ४०,००० ६०
युगोस्लाव्हिया ४३,००० २६,००० ६०
रोमेनिया ६,००,००० ३,००,००० ५०
नॉर्वे २,१७३ ८९० ४१
फ्रान्स ३,५०,००० ९०,००० २६
बल्गेरिया ६४,००० १४,००० २२
इटली ४०,००० ८,००० २०
लक्झेंबर्ग ५,००० १,००० २०
सोव्हिएत रशिया ९,७५,००० १,०७,००० ११
फिनलंड २,००० २२
डेन्मार्क ८,००० ५२ ०.६< १
एकूण &0000000008861800.000000८८,६१,८०० &0000000005933900.000000५९,३३,९०० ६७

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ संहारछावणी (इंग्लिश: Extermination camp, एक्सटर्मिनेशन कँप)
  2. ^ डेविडोविक्झ, ल्युसी. The War Against the Jews, Bantam, 1986.p. 403
  3. ^ Berenbaum, Michael. The World Must Know, United States Holocaust Memorial Museum, 2006, p. 125.
  4. ^ 1.8–1.9 million non-Jewish Polish citizens are estimated to have died as a result of the Nazi occupation and the war. Estimates are from Polish scholar, Franciszek Piper, the chief historian at Auschwitz. Poles: Victims of the Nazi Era Archived 2012-12-12 at the Wayback Machine. at the United States Holocaust Memorial Museum.
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; PolandWorldWarIIcasualties नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ "Sinti and Roma", United States Holocaust Memorial Museum (USHMM). The USHMM places the scholarly estimates at 220,000–500,000. Michael Berenbaum in The World Must Know, also published by the USHMM, writes that "serious scholars estimate that between 90,000 and 220,000 were killed under German rule." (Berenbaum, Michael. The World Must Know", United States Holocaust Memorial Museum, 2006, p. 126.
  7. ^ "Romanies and the Holocaust: a Reevaluation and Overview". Radoc.net. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-31 रोजी पाहिले.
  8. ^ Donna F. Ryan, John S. Schuchman, Deaf People in Hitler's Europe, Gallaudet University Press 2002, 62
  9. ^ "GrandLodgeScotland.com [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". GrandLodgeScotland.com. 2010-07-31 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  10. ^ The number of Slovenes estimated to have died as a result of the Nazi occupation (not including those killed by Slovene collaboration forces and other Nazi allies) is estimated between 20,000 and 25,000 people. This number only includes civilians: killed Slovene partisan POW and resistance fighters killed in action are not included (their number is estimated to 27,000). These numbers however include only Slovenes from present-day Slovenia: it does not include Carinthian Slovene victims, nor Slovene victims from areas in present-day Italy and Croatia. These numbers are result of a 10 year long research by the Institute for Contemporary History (Inštitut za novejšo zgodovino) from Ljubljana, Slovenia. The partial results of the research have been released in 2008 in the volume Žrtve vojne in revolucije v Sloveniji (Ljubljana: Institute for Conetmporary History, 2008), and officially presented at the Slovenian National Council ([File:ttp://www.ds-rs.si/?q=publikacije/zborniki/Zrtve_vojne]). The volume is also available online: [File:http://www.ds-rs.si/dokumenti/publikacije/Zbornik_05-1.pdf] Archived 2011-07-19 at the Wayback Machine.
  11. ^ The Holocaust Chronicle, Publications International Ltd., p. 108.
  12. ^ Shulman, William L. A State of Terror: जर्मनी 1933–1939. Bayside, New York: Holocaust Resource Center and Archives.