ज्यूविरोध

ज्यू धर्मियांचा विरोध

ज्यूविरोध (इंग्लिश: Antisemitism) हा शब्द ज्यू धर्मीय लोकांचा द्वेष अथवा तिरस्काराचे वर्णन करण्याकरिता वापरला जातो. जगाच्या इतिहासात आजवर ज्यूविरोधातून अनेक वेळा ज्यू लोकांसोबत हिंसा झाली आहे व काही घटनांची परिणती शिरकाणांमध्ये झाली. नाझी जर्मनीमधील न्युर्नबर्ग कायदेदुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोपामधील होलोकॉस्ट हे ज्यूविरोधाचे आजवर सर्वात मोठे उदाहरण आहे.

एका अंदाजानुसार जगातील ज्यूविरोध बळावतो आहे. मध्यपूर्वेमधील अनेक देश व राजकीय संस्था (इराण, सौदी अरेबिया, लेबेनॉन, पॅलेस्टाईन इत्यादी) उघडपणे कट्टर ज्यूद्वेष्ट्या आहेत. पाकिस्तान, सौदी अरेबिया व इतर मुस्लिम देशांमधील शालेयपुस्तकांमधून सर्रासपणे ज्यूविरोध शिकवला जातो आहे. २००० सालापासून युरोपातील अनेक देशांमधील नागरिकांचे मत ज्यू लोकांबद्दल प्रतिकूल बनत चालले आहे.


बाह्य दुवे संपादन