बोहेमिया
बोहेमिया (चेक: Čechy;[१] पोलिश: Czechy; फ्रेंच: Bohême; लॅटिन: Bohemia) हा मध्य युरोपामधील एक ऐतिहासिक भाग आहे. सध्या बोहेमिया चेक प्रजासत्ताकाच्या तीन ऐतिहासिक प्रदेशांपैकी एक आहे (इतर दोन: मोराव्हिया व सिलेसिया).
याच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस मोराव्हिया प्रांत, दक्षिणेस ऑस्ट्रिया व पश्चिमेस जर्मनी आहेत. चेक प्रजासत्ताकाची राजधानी प्राग बोहेमियामध्ये वसलेली आहे.
येथील काचेचे सामान व बियर प्रसिद्ध आहेत.
संदर्भ
संपादन- ^ There is no distinction in the Czech language between adjectives referring to Bohemia and to the Czech Republic; i.e. český means both Bohemian and Czech.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत