इ.स. १९६०
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९५७ - १९५८ - १९५९ - १९६० - १९६१ - १९६२ - १९६३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी ९ - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
- फेब्रुवारी १३ - फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
- फेब्रुवारी २१ - क्युबात फिदेल कास्त्रोने सगळ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले.
- एप्रिल १९ - दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन ऱ्ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
- एप्रिल २१ - ब्राझिलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझिलियाला हलवण्यात आली.
- एप्रिल २७ - टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- मे १ - द्वैभाषिक सौराष्ट्राचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- मे १ - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
- मे ९ - अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी.
- मे १० - अमेरिकेच्या परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. ट्रायटनने पाण्याखालून पृथ्वीप्रदक्षिणा केली.
- मे ११ - इस्रायेलच्या गुप्त पोलिसी संस्था मोसादने नाझी अधिकारी ऍडोल्फ आइकमनला आर्जेन्टिनाच्या बोयनोस एर्स शहरात पकडले.
- मे १५ - सोवियेत संघाने स्पुतनिक ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- मे २२ - चिली देशात आजतगायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप झाला. रिश्टर मापनपद्धतीनुसार याची तीव्रता ९.५ होती.
- जून २० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जून २० - सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जून २६ - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जून २६ - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जून २८ - क्युबाने खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
- जून ३० - कॉॅंगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै ११ - हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित.
- जुलै २० - सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.
- जुलै २० - साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.
- ऑगस्ट १ - बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- ऑगस्ट ३ - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- ऑगस्ट ७ - कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- ऑगस्ट १५ - कॉॅंगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- ऑगस्ट १६ - जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरून उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
- ऑगस्ट १७ - गॅबनला फ्रांस पासून स्वातंत्र्य.
- ऑक्टोबर १ - नायजेरियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
- डिसेंबर १६ - हिमवादळात न्यू यॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.
जन्म
संपादन- जानेवारी २ - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- मे २ - रवि रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- मे ४ - मार्टिन मॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे १० - बोनो, आयरिश गायक.
- ऑगस्ट ३ - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ४ - होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो, स्पेनचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २८ - ऑगस्टिन लोगी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३० - डियेगो माराडोना, आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू.
मृत्यू
संपादन- मे ३० - बोरिस पास्तरनाक, रशियन लेखक.