जून २८
दिनांक
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७९ वा किंवा लीप वर्षात १८० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०९८ - पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.
तेरावे शतक
संपादन- १२४३ - इनोसंट चौथा पोपपदी.
चौदावे शतक
संपादन- १३८९ - ओटोमन सैन्याने कोसोव्हो येथे सर्बियाला हरवले व युरोप विजयाची मुहूर्तमेढ रोवली.
सोळावे शतक
संपादनसतरावे शतक
संपादन- १६३५ - ग्वादालुपे फ्रान्सची वसाहत झाली.
- १६५१ - बेरेस्टेक्झोची लढाई.
अठरावे शतक
संपादन- १७६३ - हंगेरीतील कोमारोम शहरात भूकंप.
- १७७६ - अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी.
- १७७८ - अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३८ - इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.
- १८८० - ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.
- १८८१ - ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.
- १८८७ - मायनोत, नॉर्थ डकोटा शहराची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१४ - सर्बियाच्या नागरिक गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने सारायेवो येथे ऑस्ट्रियाचा आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची हत्या केली. पहिल्या महायुद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
- १९१९ - व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.
- १९२२ - आयरिश गृहयुद्धाची सुरुवात.
- १९३६ - चीनच्या उत्तर भागात जपान आधिपत्याखालील मेंगजियांगचे राष्ट्र अस्तित्वात आले.
- १९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.
- १९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.
- १९६० - क्युबाने खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
- १९६७ - इस्रायेलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.
- १९७८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
- १९९७ - मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबित.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १२४३ - गो-फुकुसाका जपानी सम्राट.
- १४७६ - पोप पॉल चौथा.
- १४९१ - आठवा हेन्री
- १८८३ - पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.
- १९२१ - पी. व्ही. नरसिंहराव भारतीय पंतप्रधान.
- १९२६ - मेल ब्रुक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
- १९३० - इतमार फ्रॅंको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - रॉय गिलक्रिस्ट वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - मुश्ताक अहमद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ७६७ - पोप पॉल पहिला.
- ११९४ - झियाओझॉॅंग, सॉॅंग वंशाचा चीनी सम्राट.
- १८३६ - जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
- १९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
- १९१५ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - क्लिफर्ड ड्युपॉॅंट, ऱ्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)