जून १०
दिनांक
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६१ वा किंवा लीप वर्षात १६२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनबारावे शतक
संपादन- ११९० - जेरुसलेमवर चाल करून निघालेला फ्रेडरिक बार्बारोसा सॅली नदीत बुडुन मृत्यू पावला.
सतरावे शतक
संपादन- १६९२ - सेलम, मॅसेच्युसेट्स मध्ये ब्रिजेट बिशपला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आले.
अठरावे शतक
संपादन- १७७० - कॅप्टन जेम्स कूकचे जहाज ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील ग्रेट बॅरियर रीफ वर अडकले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०५ - पहिले बार्बरी युद्ध - युसिफ करामानलीने अमेरिकेशी संधी केली.
- १८३८ - म्यॉल क्रीकची कत्तल - ऑस्ट्रेलियातील २८ स्थानिक आदिवासी व्यक्तींची हत्या.
- १८८६ - न्यू झीलंडमधील माउंट तारावेरा ज्वालामुखीचा उद्रेक. १५३ ठार.
- १८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकेचे मरीन सैनिक क्युबात उतरले.
विसावे शतक
संपादन- १९१८ - पहिले महायुद्ध - इटलीच्या छोट्या मोटारबोटीने टोरपेडो मारून हंगेरीची बॅटलशिप एस.एम.एस. इस्तवान बुडवली.
- १९२४ - इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटीची हत्या.
- १९३५ - एक्रन, ओहायोमध्ये आल्कोहोलिक्स ऍनॉनिमसची स्थापना.
- १९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने फ्रांस व युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - कॅनडाने इटली विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - फील्ड मार्शल एर्विन रोमेलचे जर्मन सैन्य इंग्लिश चॅनल पर्यंत चाल करून गेले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४४ - ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल - स्त्री व बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
- १९४४ - डिस्टोमोची कत्तल - जर्मन सैन्याने स्त्री व बालकांसह २१८ व्यक्तींची हत्या केली.
- १९६५ - व्हियेतनाम युद्ध-डॉंग सोआइची लढाई.
- १९६७ - सहा दिवसांचे युद्ध-इस्रायेल व सिरियात संधी.
- १९९७ - ख्मेर रूज नेता पॉल पॉटने आपल्याच संरक्षणमंत्री सॉन सेन व त्याच्या ११ कुटुंबियांची हत्या करण्याचे आदेश देउन पलायन केले.
एकविसावे शतक
संपादन- २००३ - स्पिरिट रोव्हर मंगळाकडे रवाना.
जन्म
संपादन- १९०८ - जनरल जयंतनाथ चौधरी, भारतीय लष्करप्रमुख.
- १९३८ - राहुल बजाज, भारतीय उद्योगपती.
मृत्यू
संपादन- १९०० - सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कवी कलापी, गुजराती कवी.
- १९०३ - लुइगी क्रेमॉना, इटालियन गणितज्ञ.
- २००१ - फुलवंतीबाई झोडगे, सामाजिक कार्यकर्त्या.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)