सीरिया

(सिरिया या पानावरून पुनर्निर्देशित)


सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉनभूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

सीरिया
الجمهورية العربية السورية
सीरियाचे अरब प्रजासत्ताक
सीरियाचा ध्वज सीरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: हुमाद अद्-दियात
सीरियाचे स्थान
सीरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
दमास्कस
अधिकृत भाषा अरबी
सरकार अध्यक्षीय एक-पक्ष प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख बशर अल-अस्साद
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १७ एप्रिल १९४६ 
क्षेत्रफळ
 - एकूण १८५,१८० किमी (८८वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.०६
लोकसंख्या
 - २००९ २,२१,९८,११०[१] (५१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९९.५४४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,८८७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७४२ (मध्यम) (१०७ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन सीरियन पाऊंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग + २:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ SY
आंतरजाल प्रत्यय .sy
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६३
राष्ट्र_नकाशा

इतिहाससंपादन करा


या विभाग http://epaper.esakal.com/eSakal/20120725/4621535099490570224.htm[मृत दुवा] येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.माजी संरक्षणमंत्री ’मुस्ताफा तलास’ माजी अध्यक्ष हाफिज अल अस्साद (बशार अल अस्साद ह्या सध्याच्या अध्यक्षांचे वडील) यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. सीरिया आणि इजिप्त ही राष्ट्रे इ.स. १९५८ ते इ.स. १९६१ च्या दरम्यान अब्दुल गमाल नासर यांच्या प्रेरणेतून 'संयुक्त अरब प्रजासत्ताक' या नावाने एक झाली होती. त्यावेळी हाफिज अल अस्साद आणि मुस्ताफा तलास हे दोघेही लष्करात होते, आणि त्यांनी सत्ताधारी बाथ पक्षातर्फे कैरो येथून या प्रजासत्ताकाबाबतची आपली जबाबदारी उचलली होती. पण हा प्रयोग फसल्यावर ही दोन राष्ट्रे पुन्हा वेगळी झाली, आणि ते दोघे परत सीरियाला परतले. त्यांनी एकत्र काम करून इ. स. १९६३ साली बाथ पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी कामगिरी बजावली. इ. स. १९६० च्या दशकात त्यांनी नेहमीच घडणाऱ्या 'राज्यक्रांत्या, ऊठसूठ नेतृत्वपालट आणि प्रति-राज्यक्रांती'च्या आवर्तनांना यशस्वीपणे तोंड देत सत्ता अबाधितपणे 'बाथ' पक्षाकडेच राखली.

तलास यांच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर हाफीज यांनी रक्तपात होऊ न देता यशस्वी राज्यक्रांती घडविली आणि तलास यांना इ. स. १९७० साली संरक्षणमंत्र्याचे पद देऊ केले. तलास कुटुंबीयांच्या व्यापक लष्करी आणि व्यावसायिक संबंधांच्या साहाय्याने सुन्नी-अलावी यांच्यामधील सत्तेच्या सर्वोच्च पातळीवरील एकोपा अनेक दशके टिकला. इ. स. २००० साली हाफीज अल अस्साद मृत्यू पावल्यानंतर तलास यांच्या पितृसदृश छायेखाली, त्यावेळी राजकारणात अगदीच नवखे असलेले बशार अल अस्साद नव्याने मिळालेल्या सत्तेवर आपली पकड दृढ करू शकले.


जुलै २०१२ मध्ये ब्रिगेडियर तलास यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशीर अल् अस्साद यांची साथ सोडली आणि ते बंडखोरांना जाऊन मिळाले. अस्साद यांच्या अल्पसंख्यांक ’अल्वाईट’ राजवटीला याच कुटुंबामुळे सुन्नी मुसलमानांकडून खंदा पाठिंबा मिळत आलेला होता.

भूगोलसंपादन करा

सीरियाचे भूगोलातील स्थान मध्यपूर्वेत आहे. या देशाची सीमा कुठेही इराणशी जोडलेली नसली, तरी इराकमधून हे दोन्ही देश एकमेकांना जोडलेले आहेत.

सीरियाच्या चतुःसीमासंपादन करा

तुर्कस्तान असून पश्चिमेला लेबॅनॉन आणि भूमध्यसागर आहे. दक्षिणेला जॉर्डनइराक असून, पूर्वेलाही इराक आहे.

सीरियाचे प्रशासकीय विभागसंपादन करा

सीरिया देश प्रशासनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे विभाजित करण्यात आलेला आहे.

  • १४ प्रशासकीय विभाग (मुहाफजल)
  • ६४ जिल्हे (मिन्तार्क)
  • २७५ उपजिल्हे (न्हीया)

सीरियामधील महानगरेसंपादन करा

दमिश्क - अलेप्पो - लताकिया - होम्स - हमा

सीरियामधील मोठी शहरेसंपादन करा

अल-हसाख - दीर अज़-ज़ोर - अर-रक्का - इदलिब - डारा - अस-सुवयदा - तरतूस.

छोटी शहरेसंपादन करा

अल कमीशली - नवा - अर-रास्तान - मयसफ़ - सफ़िता - जाब्लेह - अथ-थवारा - दुमा - बनियास - अन-नब्क- कुसैर - मालौला - ज़बादानी - बोसरा - जरामाना - अत-ताल - सलामिये- सैदान्या - अल-बाब - जिस्र अल-शुग़ुर

समाजव्यवस्थासंपादन करा

धर्मसंपादन करा


या विभाग http://epaper.esakal.com/eSakal/20120725/4621535099490570224.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.सीरियाची लोकसंख्या सव्वादोन कोटी आहे व त्यात ७४ टक्के जनता सुन्नी मुस्लिम (जास्त करून अरब वंशाचे सुन्नी पण त्यात कुर्द, सिर्काशियन आणि तुर्कमानी लोकही येतात) असून १२ टक्के अरब वंशाचे अलावाईत आणि शिया या आहेत. उरलेल्यांत १० टक्के ख्रिस्ती आहेत (त्यात अरब, असीरियन आणि आर्मेनियन वंशाचे लोक येतात) आणि ३ टक्के ड्रूझ (यांनाही शियापंथीय मानले जाते) आहेत. म्हणजेच ८७ टक्के सीरियन लोक मुस्लिम असून जास्त करून अरब वंशाचे आहेत.

सीरियावरील पुस्तकेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: