निळू दामले
निळू दामले हे मराठी भाषेतील एक लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी अफगाणिस्तानी तसेच भारतीय मुसलमानांबद्दल लिहिले आहे.
निळू दामले | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | वृत्तपत्रीय लेखन |
परिचयसंपादन करा
निळू दामले यांनी १९६८ पासून मराठीत लिहायला सुरुवात केली. अनंतराव भालेराव ह्यांच्या मराठवाडा दैनिकातून निळू दामले ह्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस ह्यांचे सचिव म्हणून काम केले. अशोक शहाणे यांच्या सोबतीने दामले यांनी दिनांक ह्या साप्ताहिकाचे संपादन केले. त्याबरोबरच दामले ह्यांनी माणूस, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, किर्लोस्कर, मनोहर अशा नियतकालिकांतून लिखाण केले आहे.[१] मराठी नियतकालिकांसोबतच त्यांनी धर्मयुग, दिनमान ह्यांसारख्या हिंदी नियतकालिकातही लेखन केले. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतून त्यांनी पत्रकारिता आणि संवाद या विषयांवर अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे.
विज्ञान परिषद पत्रिका, महानगर इत्यादी नियतकालिकांचे ते संपादक होते. .
निळू दामले यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा
- अवघड अफगाणिस्तान
- इस्तंबूल ते कैरो : लेखकाच्या दृष्टीतून इस्रायलची दोन वर्षे
- उस्मानाबादची साखर आणि जगाची व्यापारपेठ
- ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा
- जेरुसलेम : इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष
- टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध
- टेलेवर्तन
- दुष्काळ - सुकाळ : जत, चीन, दक्षिण कोरिया, इथियोपिया
- धर्मवादळ : धर्मात वादळ, वादळात धर्म
- पाकिस्तानची घसरण
- पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान
- बदलता अमेरिकन
- बाँबस्फोटानंतर... मालेगाव
- माणूस आणि झाड
- लंडन बॉम्बिंग २००५
- लवासा
- सकस आणि सखोल
- सीरिया - सगळे विरुद्ध सगळे
माहितीपटसंपादन करा
निळू दामले यांनी मुंबईतील धेड गल्ली येथे पहाटे चार वाजता भरणाऱ्या चप्पल आणि बुटांच्या बाजाराविषयी धेड गल्ली हा माहितीपट तयार केला आहे.[१] याशिवाय त्यांनी गणेश-विसर्जन, शीला चिटणीस यांची झुंज, लक्ष्मीज् स्टोरी असे विविध माहितीपटही बनवले आहेत..[२]
पुरस्कारसंपादन करा
संदर्भनोंदीसंपादन करा
संदर्भसूचीसंपादन करा
- "निळू दामले". Archived from the original on २३-०३-२०१५. २४-११-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=, |विदा दिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
- "निळू दामले". Archived from the original on २३-०३-२०१५. २४-११-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=, |विदा दिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - "निळू दामले ह्यांची यूट्यूब-वाहिनी". Archived from the original on १९-०७-२०१०. २४-११-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=, |विदा दिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)