जून १
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५२ वा किंवा लीप वर्षात १५३ वा दिवस असतो.
१ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो.
पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो.
कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह डॉ. आ.ह. साळुंखे, रंगनाथ पठारे, डॉ. रमेश धोंडगे, राजन गवस, लक्ष्मण माने, व.बा. बोधे, शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनदुसरे शतक
संपादन- १९३ - रोमन सम्राट डिडियस ज्युलियानसची हत्या.
पंधरावे शतक
संपादन- १४८५ - हंगेरीचा राजा मथियासने ऑस्ट्रियातील व्हियेना शहर जिंकले वा तेथे आपली राजधानी वसवली.
- १४९५ - फ्रायर जॉन कॉरने सर्वप्रथम स्कॉच व्हिस्की तयार केली.
सतरावे शतक
संपादन- १६६० - अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात बंदी असताना क्वेकर धर्म पाळल्याबद्दल मेरी डायरला फाशी.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८१२ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने अमेरिकन काँग्रेसला युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारण्याची विनंती केली.
- १८१५ - नेपोलियन बोनापार्टने फ्रांसच्या घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली.
- १८५५ - अमेरिकेच्या विल्यम वॉकरने निकाराग्वा जिंकले व गुलामगिरीची पद्धत पुनः सुरू केली.
विसावे शतक
संपादन- १९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना
- १९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - नेपाळच्या युवराज दिपेन्द्रने राजा बिरेन्द्रसह सगळ्या कुटुंबाला गोळ्या घातल्या व नंतर स्वतःवरही गोळी झाडली.
- २००१ - तेल अवीवमध्ये हमासच्या आत्मघातकी मारेकऱ्याने आपल्यासह २१ लोकांना यमसदनी धाडले.
- २००३ - चीनच्या थ्री गॉर्जेस डॅम धरणात पाणी साठण्यास सुरुवात.
जन्म
संपादन- १०७६ - म्स्तिस्लाव पहिला, कीयेवचा राजा.
- १८०४ - ब्रिगहॅम यंग, मॉर्मोन चर्चचा संस्थापक.
- १८१५ - ओट्टो, ग्रीसचा राजा.
- १८३१ - जॉन बेल हूड, अमेरिकेतील दक्षिणेचा सेनापती.
- १९०७ - फ्रँक व्हिटल, जेट इंजिनचा शोधक.
- १९१७ - विल्यम एस. नौल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९२९ - नर्गिस दत्त, भारतीय अभिनेत्री.
- १९३७ - मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.
- १९७० - आर. माधवन, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७३ - हाइडी क्लुम, जर्मन मॉडेल.
- १९८२ - जस्टिन हेनिन-हार्डिन, बेल्जियमची टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९५ - हानवंशीय गाओझु, चिनी सम्राट.
- १९३ - डिडियस जुलियानस, रोमन सम्राट.
- १४३४ - व्लाडिस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १८४६ - पोप ग्रेगोरी सोळावा.
- १८६८ - जेम्स बुकॅनन, अमेरिकेचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, नाटककार आणि विनोदी लेखक.
- १९४६ - इयॉन ॲंतोनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.
- १९६८ - हेलन केलर.
- १९९६ - नीलम संजीव रेड्डी, भारतीय राष्ट्रपती.
- १९९८ - गो.नी. दांडेकर, मराठी कादंबरीकार.
- २००२ - हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- २०२० - साजिद-वाजिद या संगीतकार जोडीमधला वाजिद खान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)