अण्णासाहेब हरी साळुंखे

महाराष्ट्र, भारतातील संस्कृत भाषेचे अभ्यासक, धर्मशास्त्रज्ञ, मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते
(आ.ह. साळुंखे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे (जन्म : खाडेवाडी-सांगली जिल्हा,14 ऑक्टोबर , १९४३) हे मराठीतले लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. ते सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्‌सचे डीन) व ॲकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]

अण्णासाहेब हरी साळुंखे
डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय

डॉ. आ.ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १००हून अधिक लेख लिहिले आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्या सुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१ च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.[ संदर्भ हवा ]

४ ऑगस्ट २००९ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती. या समितीत डॉ.आ. ह. साळुंखेंखेरीज वि.वि.करमरकर, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शफाअत खान, गिरीश गांधी, डॉ.अरुण टिकेकर, अशोक नायगांवकर, आमदार उल्हास पवार, प्रा.दत्ता भगत हे सदस्य होते. समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली आहे.[ संदर्भ हवा ]

डॉ. साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खाडेवाडी या लहानशा गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. संस्कृत विषयात पहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून घेतली. एम.ए.मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी १९८६मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथे चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास ह्या विषयावरील पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला.[१]

वैयक्तिक

संपादन
 • आ.ह. साळुंखे यांच्या पत्‍नीचे नाव मधुश्री. त्यांचे २५ एप्रिल २००० रोजी कॅन्सरने निधन झाले.
 • आ.ह. साळुंखे यांचे चिरंजीव नीरज साळुंखे हे प्राध्यापक आणि लेखक आहेत.
 • दुसरे चिरंजीव राकेश यांची लोकायत ही प्रकाशन संस्था आ.ह.साळुंखे तसेच इतर लेखकांचीही पुस्तके प्रकाशित करते.[ संदर्भ हवा ]

आ. ह. साळुंखे यांची ग्रंथसंपदा

संपादन
 • अंधाराचे बुरुज ढासळतील !
 • अशी भेटत रहा तू!
 • अस्तिकशिरोमणी चार्वाक
 • आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल
 • प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक
 • एकलव्य
 • एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई
 • ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा
 • गुढी आणि शंकरपार्वती
 • गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो (पुस्तिका)
 • चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून !
 • चार्वाकदर्शन (पुस्तिका)
 • चिंतन - बळीराजा ते रवींद्रनाथ
 • जीवनाची लय वेदनेत
 • तुकारामांचा शेतकरी
 • विद्रोही तुकाराम
 • विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा
 • संत तुकारामांचे अभंगशतक
 • न सरे ऐसे तुकोबांचे दान
 • तुझ्यासह आणि तुझ्याविना
 • तुळशीचे लग्न : एक समीक्षा
 • त्यांना सावलीत वाढवू नका!
 • धर्म की धर्मापलीकडे?
 • ना गुलाम,ना उद्दाम
 • परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे
 • परिवर्तन : शास्त्रही, कलाही
 • पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर
 • पोकळ आक्षेप विरुद्ध भक्कम भूमिका (डॉ. आ. ह. साळुंखे यांची मुलाखत)
 • बळीवंश
 • बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते
 • तथागत बुद्ध आणि संत तुकाराम
 • बुद्धस्तोत्र
 • सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
 • सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप (डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका)
 • बुद्धांचे मंगलसुत्त
 • मन निरभ्र व्हावं
 • मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (पुस्तिका)
 • महात्मा फुले आणि धर्म
 • महात्मा फुले आणि शिक्षण
 • महाभारतातील स्त्रिया भाग १
 • महाभारतातील स्त्रिया भाग २
 • महाभारतातील स्त्रिया भाग ३ (ना गुलाम,ना उद्दाममधून)
 • मित्रांना शत्रू करू नका !
 • वादांची वादळे
 • वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (पुस्तिका)
 • शंबूकहत्या आणि सीतात्याग प्रक्षिप्त (पुस्तिका)
 • शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात
 • शिवराय : संस्कार आणि शिक्षण
 • छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक
 • संवाद - सहृदय श्रोत्यांशी
 • हिंदू संस्कृती आणि स्त्री
 • हृदयातून हृदयाकडे
 • जिज्ञासापुरुष : ह्युएनत्संग
 • गयासुर आणि महिषासुर

साळुंखे यांनी मराठीमध्ये अनुवादित केलिली पुस्तके

संपादन
 • के. सच्चिदानंद यांचे नागार्जुन (मूळ संस्कृत) इंग्रजीमधून मराठीत
 • कर्तारसिंग दुग्गल यांचे शीख धर्मातील निरपेक्ष जाणिवा (मूळ इंग्रजी)
 • एरिख फ्रॉम याचे स्वातंत्र्याचे भय(मूळ इंग्रजी)
 • लाटकरशास्त्री यांचे शाहूचरतिम्(मूळ संस्कृत)

पुरस्कार, मानसन्मान, भेटवस्तू वगैरे

संपादन
 • ७ फेब्रुवारी १९९९ रोजी बाबूराव बागूल यांच्या संमेलनाध्यक्षपदी मुबईत धारावी येथे झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक
 • रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान(वाई)चा महर्षी वि.रा. शिंदे पुरस्कार (१०-४-१९९९)
 • जुलै १९९९मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित केलेल्या यज्ञविरोधी परिषदेतील एक वक्ते. अन्य वक्ते डॉ. श्रीराम लागू व डॉ. नरेंद्र दाभोलकर.
 • सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेल्या मारुती व्हॅनची भेट (१४-१०-१९९९). (या गाडीने डॉ. आ.ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देण्याच्या निमित्ताने २० वर्षांत ४० हजार किलोमीटर प्रवास केला.)
 • २४-२५ एप्रिल१९९९ या काळात जळगाव येथे गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक.
 • १७-१९ डिसेंबर १९९९ या काळात सातारा येथील आंबेडकर अकादमीतर्फे बेळगाव येथे आयोजित केलेल्या ’संस्कृती आणि इतिहास’ या विषयावरील विचारवेध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 • ८-९ जुलै २००० या काळात मराठा सेवा संघाने अमरावती येथे आयोजित केलेल्या पहिल्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
 • छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (थोरले) यांच्या त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा नगरपालिकेने दिलेला पुरस्कार (१९-१-२०१०)
 • मारवाडी फाउंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा 'प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार' (नोव्हेंबर २०११)
 • बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथील पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२४-११-२०१२).
 • वाशीम येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या तिसऱ्या राष्ट्रीय महिला अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून सहभाग (२९-११-२०१२).
 • पुणे येथे झालेल्या ३ऱ्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष (१६-१७ फेब्रुवारी २०१३).
 • पुण्यात झालेल्या पुणे महापालिका आयोजित पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. (२४-२-२०१३)
 • महाराष्ट्र शासनाचा दोनदा डॉ. आंबेडकर पुरस्कार
 • सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार
 • पंढरपूरच्या कैकाडी मठाचा पुरस्कार
 • बीड येथील पिंगळे वाचनालयाचा महात्मा फुले पुरस्कार
 • तीन वेळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
 • शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार
 • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार
 • मुंबईच्या अश्वघोष आर्ट्‌स ॲन्ड कल्चरल फोरमतर्फे ‘महाकवी अश्वघोष जीवन गौरव पुरस्कार’ (मे २०१६)
 • १२ डिसेंबर २०१५ रोजी रहिमतपूर (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे संपन्न झालेल्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष [ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन


संदर्भसूची

संपादन
 • साळुंखे, आ. ह. (१९८६), चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ह्यांचा पीएचडीसाठी सादर केलेला प्रबंध)

बाह्य दुवे

संपादन