विचारवेध संमेलन

(विचारवेध साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारांचे संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरू झाले आहे. पुन्हा सुरू झालेल्या पुन्हा सुरू झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरू केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.

नवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे.

विचार-वेध : उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती संपादन

१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात येत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावांत हे संमेलन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने भरवीत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत धर्म आणि राजकारण यांच्या संबंधांची सखोल चिकित्सा करण्यासाठी पहिले विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात आले. ‘विसाव्या शतकाचे एकविसाव्या शतकाला योगदान’ हे या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते. विसाव्या शतकाचा आढावा संपला आणि एकविसावे शतक नुकतेच सुरू झाले होते, त्याचा आढावा घेणे तेव्हा शक्य नव्हते, तेंव्हा ही संमेलने थांबवण्याचा निर्णय आंबेडकर अकादेमीने घेतला, आणि २००७ नंतर ही संमेलने आयोजित करण्यात खंड पडला.

त्यानंतर असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे.  समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली.

'भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हा विचार-वेध मंच हक्काने उपलब्ध आहे.

'वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी 'विचारवेध'तर्फे अनेक उपक्रम राबविले जातील. वार्षिक संमेलने हा तर या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेलच पण त्याच बरोबर (अ) अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे (ब) गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे (क) वक्तृत्वस्पर्धा भरवणे (ड) लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे (ए) परिसंवाद आयोजित करणे इत्यादी उपक्रमांचाही 'विचारवेध'मधे समावेश असेल.

'विचार- वेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडित असावेत असा प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. सामेलानातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि‘पारदर्शी’असेल. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे ठरवावेतअशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात येईल. 'विचार-वेध'मध्ये माहिती आणि  प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील. विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रिय राजकारण करण्यची गरज पूर्णतः मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मध्ये सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी.  पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये या साठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वतः दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही, विचार-वेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल.  परदेशी संस्थांकडून विचार-वेध आर्थिक साहाय्य स्वीकारू शकणार नाही पण त्यांनी विचार-वेधचा प्रचार आणि व्याप वाढविण्यास (वक्ते, श्रोते, चर्चेतील सहभाग, स्थानिक संमेलने, इत्यादि) केलेल्या सहकाराचे विचारवेध स्वागतच करेल.'

विचारवेध संमेलने संपादन

पूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वर दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही.

  • १ले विचारवेध संमेलन १९९४. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा). संमेलनाध्यक्ष प्रा. मे.पुं. रेगे होते.
  • १९९६; ३रे विचारवेध संमेलन : इचलकरंजी . आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी(सातारा) आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी.
  • सोलापूर येथे १९९८ साली विचारवेध साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष डॉ.भा.ल. भोळे होते.
  • ४थे विचारवेध संमेलन नाशिक. संमेलनाध्यक्ष प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट.
  • ४थे आदिवासी विचारवेध संमेलन; फेब्रुवारी २००७; शहादा (जिल्हा धुळे)
  • वर्धा : २० ते २२ डिसेंबर २००२; १०वे विचारवेध संमेलन
  • पिंपरी ऑगस्ट २०१०. १०वे विचारवेध संमेलन अध्यक्ष डॉ. विकास आबनावे. आयोजक : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद
  • वाशी(नवी मुंबई) : २६ ते २८ डिसेंबर २००३ : ११वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी (सातारा). संमेलनाध्यक्ष : प्रा. रमेश पानसे
  • बार्शी :२६ ते २८ नोव्हेंबर २००४; १२वे विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष बगाराम तुळपुळे
  • वडघर (तालुका माणगाव, जिल्हा रायगड) : १३वे विचारवेध संमेलन २८ ते३०-१२-२००५ या काळात; संमेलनाध्यक्ष : डॉ.यशवंत सुमंत
  • २००८ : शिरूर
  • १५वे : २००९ : १५वे विचारवेध संमेलन. आयोजक बाबासाहेब आंबेडकर अकादमी (सातारा)
  • १६वे : पिंपरी(पुणे) येथे १६-९-२०१२ रोजी : १६वे दलित साहित्य विचारवेध संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन झाले.
  • १७वे : वाघोली(पुणे) येथे ११ ऑक्टोबर २०१३ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भारतीय जैन संघटनेचे वाघोलीतील कला-वाणिज्य महाविद्यालय यांच्या तर्फे १७वे स्त्री-साहित्य विचारवेध संमेलन झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. आश्विनी रमेश धोंगडे होत्या.
  • विचारवेध संस्थेतर्फे नव्यानेच (पुन्हा सुरू होणारे) विचारवेध संमेलन पुणे शहरात २० ते २२ जानेवारी २०१७ रोजी झाले. भारताचा राष्ट्रवाद, संकल्पना, स्वरूप आणि आव्हाने हे या संमेलनाचे मध्यवर्ती सूत्र होते.
  • विचारवेध संमेलन २०१८ : १७ फेब्रुवारी २०१८, एसेम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे
  • विचारवेध संमेलन-२०१९ : वक्ते- जयंती घोष, अच्युत गोडबोले, आशुतोष भूपटकर, रजनी बक्षी, धम्मसंगिनी, विजय नाईक, मुक्ता मनोहर, तारक काटे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ (पुणे) : १२ जानेवारी २०१९, स. ९ ते रात्री ८. [१][permanent dead link]

पहा : मराठी साहित्य संमेलने

विचारवेध वेबसाईट लिंक :- http://www.vicharvedh.org/ Archived 2016-12-18 at the Wayback Machine.