विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

शेतकरी ही शेती करणारी व्यक्ती असते.

इतिहाससंपादन करा

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आदिमानवाच्या विचारातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला 'कृषी प्रधान' देश म्हटले जातात.

शेतकऱ्यांना लागणाऱ्या मूलभूत गोष्टीसंपादन करा

शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.

Dinu==शेतकऱ्यावर येणारी संकटे== शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या आहे

शेतकऱ्यांचे मित्रसंपादन करा

गाय, बैल, म्हैस, रेडा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या गांडूळ असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.

पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या लागल्या.

शरद जोशीसंपादन करा

शरद जोशी हे शॆतकऱ्यांचे सर्वश्रेष्ठ नेते होते.

शेतकरी विषयावरील पुस्तकेसंपादन करा

 • आम्ही कास्तकार
 • शेतकरी मराठी निबंध
 • गारपीट (भारत दॆवगावकर)
 • चाळीस शतकांचे शेतकरी (डाॅ. जयंतराव पाटील)
 • पाण्याशप्पथ (प्रदीप पुरंदरे)
 • भारत समृद्ध शेती : गरीब शेतकरी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डाॅ रमाकांत पितळे; मराठी अनुवाद - संजीव रायपायले)
 • मराठी शेतकरी (कृषी ॲप)
 • महात्मा फुले आणि शॆतकरी चळवळ (डाॅ अशोक चौसाळकर)
 • योद्धा शेतकरी (शरद जोशी)
 • शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा (वसुंधरा काशीकर-भागवत)
 • शेतकरी आत्महत्या कारणे व शाश्वत उपाय (विनायक हेगाणा)
 • शेतकरी जेव्हा जागा होतो (अभिमन्यू सूर्यवंशी)
 • शेतकरी नावाचा माणूस (बाळासाहेब जगताप )
 • शॆतकरी राजा (शंकर सखाराम)
 • शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती (शरद जोशी)
 • शेतकी मासिक (महाराष्ट्र सरकारचे मोफत प्रकाशन)
 • शॆतकऱ्याचा असूड (महात्मा फुले)
 • शॆतकऱ्यांची आत्महत्या (वास्तव आणु उपाय) - लेखक : डाॅ संभाजी काळे, डाॅ. विलास खंदारे)
 • शॆतकऱ्यांची राजकीय भूमिका (डाॅ. गिरधर पाटील)
 • शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
 • शेतकऱ्यांचे स्वराज्य (लेखक - प्रबोधनकार ठाकरे)
 • स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (अतुल देऊळगाकर)