कृषि दिन (महाराष्ट्र)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचेे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे घोषित केेेेले असून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.[१]

कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे वसंतराव नाईक हे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी होते.

वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. त्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राचा पताका दिल्लीतही गौरवशाली राहिला. वसंतराव नाईक यांनी पायाभरणी केलेल्या रोजगार हमी योजना व पंचायत राज' पुढे केंद्रस्थानी दखल घेण्यात आली. आज देशभरात याची अंमलबजावणी होताना दिसते.

वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदाच चार कृषीविदयापिठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील नव्हता, शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे मुलं कलेक्टर झाली पाहिजे." हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.