एकनाथ पवार

भारतीय कवी, साहित्यिक व विचारवंत

एकनाथ पवार हे एक भारतीय कवी, साहित्यिक, विचारवंत व चित्रपट गीतकार आहेत. संविधानिक आणि मानवी मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते असून सामाजिक , शैक्षणिक व पर्यावरण चळवळीतील एक नामवंत व्यक्तिमत्त्व आहे. श्यामची शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी गीते लिहीली. याशिवाय 'क्लीन ग्रीन' , 'शिवार माझंं जलयुक्त' या लघुपटांत देखील त्यांनी रचलेली गाणी आहेत.

एकनाथ पवार
एकनाथ पवार यांचे रेखाचित्र
जन्म १० जुलै
वाशीम, विदर्भ
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र साहित्य,शिक्षण,चित्रपट
वडील विश्वनाथराव पवार
आई भाग्यरथी पवार
पुरस्कार  • लक्ष्यवेधी साहित्यिक पुरस्कार,
 •  विदर्भ भूषण पुरस्कार,
 •  केंद्र सरकार पुरस्कृत युवा पुरस्कार,
 •  व्यसनमुक्ती पुरस्कार,
 •  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,
 •  महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार , वसंंतराव नाईक कृषीदूत पुरस्कार

त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथराव , तर आईचे नाव भाग्यरथी असे आहे. त्यांनी ग्रामीण जीवनाचे दुःख , मानवीय मूल्यांचा प्रखर जागर, वंचितांच्या वेेेेदना याबरोबरच शेेेतकऱ्यांचे प्रश्न यांवर लिखाण केले आहे. त्यांच्या अनेक रचना आकाशवाणीवर प्रसारित झालेल्या आहेत. वृत्तपत्रातून विपुल लेेखनही केले आहे. 'क्लीन ग्रीन' या लघूपटालाही पवारांची सुमधूर गाणी लाभलेली असून यात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी भूमिका साकारली. श्यामची शाळा या टॅक्स फ्री चित्रपटात अरुण नलावडे, विजय पाटकर , मिलिंद शिंदे, अभिनेत्री निशा परूळेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.[१][२][३][४]

विधानपरिषदेत विशेष उल्लेख संपादन

शेतकऱ्यांना सन्मान व आत्मबळ मिळावे, तसेच आत्महत्या पासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी, यासाठी एकनाथ पवार यांनी  थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम सुरू केली. सन २०१७ मध्ये विधानपरिषदेत  विशेष उल्लेख केला गेला. तसेच  सन २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा सन्मानही मिळाला. 'रिव्ह्योल्यूशनरी इनिशीवेटीव्ह फाॅर फाॅर्मर्स' म्हणून त्यांच्या संकल्पनेची नोंद झाली. १ जुलैला कृषी दिन साजरा करण्याचा सर्वप्रथम निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला. तर कृषीप्रधान देशात 'कृषी दिन' थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव प्रथा एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम सुरू केली. साहित्य लेखनाबरोबरच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात देखील त्यांनी योगदान दिले. संविधानिक जाणिव रुजावी, वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी 'संविधानिक हक्क साक्षरता मोहीम'('Constitutional Rights Literacy Campaign') सुद्धा हाती घेतली. शेतकऱ्याप्रति कृतज्ञतेचे मूल्ये नव्या पिढीत रुजावीत म्हणून 'सेल्फी विथ फार्मर', बांधावर 'एक शेतकरी-एक फळझाड', 'बांधावरची शेतीशाळा' ही अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीमेचे प्रणेते' याशिवाय 'विदर्भाचा युथ आयकॉन' , 'शिक्षणतज्ञ' म्हणून देखील त्यांची ओळख आहे.[५][६][७]

शैक्षणिक , सामाजिक व राष्ट्र निर्माण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाने एकनाथ पवार यांना 'राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार' ने सन्मानित केले. पवारांनी शिक्षणाचे प्रसार करतांना प्रयोगशिलतेतून वंचितांच्या सबलीकरणासाठी मोलाचे योगदान दिले.

संदर्भ संपादन

  1. ^ "श्यामची शाळा, मराठी चित्रपट". मराठी मुव्ही वर्ल्ड.
  2. ^ "प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवारांची निवड". नागपूर: Vidarbha 24 News. २०१९.
  3. ^ "Eknath Pawar filmography". Indian film industry.
  4. ^ तिजारे, सुनील (मे २०१८). "'क्लीन ग्रीन' चित्रपटात वैदर्भीय एकनाथ पवारांची सुमधूर गाणी". नागपूर: देशोन्नती वृत्तपत्र.
  5. ^ "Revolutionary initiative for farmers". नवी दिल्ली: आयबीआर. २०१९.
  6. ^ मोहोड, सागर (२०१९). "Krushidoot toiling to save farmers from ending lives". नागपूर: हितवाद.
  7. ^ जोशी, रेवती (मार्च २०१७). "विदर्भाचा युथ आयकॉन : एकनाथ पवार". नागपूर: तरुण भारत. pp. ११.