बेडूक
बेडूक हा उभयचर प्राणी आहे. बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते.त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात बेडूक जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.पुराणात बेडकावर 'मान्दुकासुक्त' आहे.
स्वरूप
संपादननर बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो. मादी बेडूक क्वचितच आणि हळू आवाज काढते. बेडूक संपूर्ण मांसाहारी असतात. हल्लीच्या काळात तंगड्यांची परदेशी निर्यात करण्याच्या मोहात बेडकांची हत्या जास्त प्रमाणात होते. त्यामुळे बेडकांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात शीतनिद्रा अवस्था संपवून बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांना प्रजननाआधीच मारले जाते. काही बेडूक शेतात टाकलेल्या आणि नंतर पाण्यात विरघळलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी, त्वचेद्वारे श्वसनक्रियेसाठी शोषून घेतो. यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत.
उडता बेडूक
संपादनआंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर परिसरातही या बेडकाची नोंद डॉ. गणेश मर्गज व सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांनी घेतली आहे.
कायदा
संपादनबेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्य प्राणी म्हणून घोषित केले गेले आहे. त्यासाठी १९८५ साली भारताच्या वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे कैद अशी कडक सजा दिलेली आहे.
२९ एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.
बाह्य दुवे
संपादनठळक मजकूर