म्हैस
म्हैस हा एक वन्य गुरांचा प्रकार आहे, आहे ज्यात खऱ्या म्हशींच्या विविध प्रजातींचा समावेश होतो. या प्रजातींमध्ये आफ्रिकन म्हैस, ॲनोआ, जंगली म्हैस आणि पाण म्हैस यांचा समावेश होतो. पाण म्हैस हा भारतात आढळणारा म्हशीचा मुख्य प्रकार असून हिला 'भारतीय म्हैस' असे देखील म्हणतात.
म्हैस | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मुऱ्हा जातीची पाण म्हैस
| ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
Bubalus bubalis Linnaeus, इ.स. १८२७ | ||||||||||||||
आढळप्रदेश
| ||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||
Bos bubalis |
हा प्राणी काळ्या, गडद राखाडी किंवा करड्या रंगाचा असू शकतो. तसेच हा पाळीव आणि जंगली अशा दोन्ही प्रकारात मोडतो. याव्यतिरिक्त हा नदी किंवा पाण्यात डुंबणारा किंवा दलदलीत लोळणारा असू शकतो. हे दुधाळू जनावर असून यातील नर प्राण्याला रेडा तर मादिस म्हैस असे म्हणतात.
सध्या, उप-सहारा आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये म्हशी जंगली आणि घरगुती स्वरूपात आढळतो. जंगली म्हशी मोठ्या प्रमाणावर युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहेत.[१] जिवंत प्रजातींव्यतिरिक्त, म्हशींचे विस्तृत जीवाश्म रेकॉर्ड आहेत जेथे अवशेष बहुतेक आफ्रो-युरेशियामध्ये सापडले आहेत.
जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[२]आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.