बायसन
बायसन (Bison) हा एक शाकाहारी सस्तन खुरधारी जंगली प्राणी आहे. हा बहुतांश यूरोपीय देश आणि अमेरिका खंडात आढळतो. बायसन मध्ये माहिती असलेल्या सहा प्रजाती आहेत. पैकी दोन प्रजाती अस्तित्वात असून चार प्रजाती लुप्त झाल्यात.[१]
बायसन Bison 2–0 Ma Early Pleistocene– Present | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अमेरिकन बायसन (Bison bison)
युरोपियन बायसन(Bison bonasus)
| ||||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||||
| ||||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||||
बायसन बायसन हैमिल्टन, १८२७ | ||||||||||||||||
बायसन बोनासस | ||||||||||||||||
इतर प्रजाती | ||||||||||||||||
B. bison |
बायसन हा गाय, याक आणि गौर यांच्या गणगोताला महाकाय - २ मीटर उंच आणि ४०० ते १२७० किलोग्राम वजनाचा पशु आहे. त्याची शिकार हा मूलवासियांच्या जीवनात शैलीचा गाभा होता. शेकडो वर्षे चाललेल्या त्यांच्या या शिकारीततून बायसनांची संख्या अजिबातच घटली नव्हती. परंतु गोऱ्या व्यावसायिक शिकाऱ्यांनी आणि अमेरिकी सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची शिकार केली की इसवी सन अठराशे मध्ये जे ६ कोटी बायसन होते ते १८९० पर्यंत जवळ जवळ संपुष्टात आले. मूलवासियांच्या दृष्टीने बायसन हा ईश्वरनिर्मित निसर्गाचा एक आविष्कार, आणि त्यांच्या आध्यात्मिक आणि भावनिक जगाचा मूलभूत घटक होता. बायसनचा विध्वंस हा त्यांच्या जिव्हारी आघात होता. क्रो जमातीच्या प्लेंटी कूप्स (१८४८- १९३२) या मुखंडाच्या शब्दांत: “बायसन निघून गेल्यावर आमचे लोक इतके हताश झाले की त्यांना काहीही सुचेनासे झाले. त्यांचे नाच गाणे पूर्ण थांबले”. बायसन नष्ट झाल्यावर मूलवासियांना रेटत रेटत देशाच्या एका कोपऱ्यातल्या मर्यादित राखीव भागात बंदिस्त करून टाकले. मग जिथे हे कोट्यवधी बायसन चरत होते तो सगळा गवताळ मुलुख अमेरिकेचा सुपीक शेती आणि दुग्ध उत्पादनाचे केंद्र बनला.[२]
अमेरिकन बायसन (bison bison) हा उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आढळतो. तिथे याचे अजून दोन उपप्रकार आढळतात, प्लेन बायसन आणि वूड बायसन. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. तेव्हापासून ते आजतागायत कॅनडा आणि अमेरिकेत बायसनचे बफेलो हे नाव कायम झाले.[३][४] विशेष म्हणजे मूळ म्हैस आणि बायसन पशु यांचा संकर घडवून झुब्रॉन आणि बैल व बायसन यांचा संकर घडवून बिफॅलो आशा दोन नवीन जीवांची पैदास करण्यात आली.
युरोपियन बायसन (bison bonasus) ही बायसनची दुसरी प्रजाती युरोप आणि कॉकेशस मध्ये आढळते. ही युरोपियन प्रजाती लुप्त होण्यापासून महत्प्रयासाने वाचवण्यात आली.[५]
संदर्भ
संपादन- ^ Brink, Jack W. (2008). Imagining Head-Smashed-In: Aboriginal Buffalo Hunting on the Northern Plains Archived १६ डिसेंबर २०११, at the Wayback Machine. (PDF). Athabasca University Press. ISBN 978-1-897425-09-1.
- ^ Gadgil, Madhav (2023). Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी. Pune: Rajhans prakashan. ISBN 978-93-95483-26-1.
- ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Olson, Wes. "Bison". The Canadian Encyclopedia. 17 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "The European bison is no longer a vulnerable species" (इंग्रजी भाषेत). 2021-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.