सस्तन प्राणी

(सस्तन या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

सस्तन प्राणी

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

प्रकार

संपादन

सस्तन प्राण्यांची श्रेणीनुसार यादी

  1. किटाद (Insectivora) हे किडे खाणारे पशू आहेत. यांना पाच बोटे असतात आणि तोंड लांबट असते. उदा. चिचुंदरी
  2. निपतत्री (Dermoptera) यांना पंख असतात, त्यात सांगाडा नसतो, पंख केवळ खाली उतरण्याच्या उपयोगी पडतात. उदा. पंखवाले लेमूर
  3. उत्पतत्री (Chiroptera) यांना पंख असतात, त्यात हाडाचा सांगाडा असतो, ते वर उडण्याच्या उपयोगी पडतात पण यांना पिसे नसतात. उदा. वटवाघुळे
  4. प्रकृष्ट (Primates) यांचा मेंदू प्रकर्ष पावलेला असतो. यांना मूठ आणि चिमूट वळता येते. यातील प्राण्यांना पशूत्तम आणि जीवोत्तम असेही म्हणतात. उदा. माणूस
  5. अदंत (Edentata) यांना दात नसतात किंवा असले तरी ते कुरतडण्याच्या कामी येत नाहीत. उदा. पँगोलिन
  6. कृंतक (Rodentia) यांचे दात कुरतडण्याच्या कामी उपयोगी असतात. उदा. उंदीर
  7. मांसाहारी (Carnivora) यांना मांस खाण्यासाठी सुळे व दाढा असतात. उदा. मांजर
  8. तिमी (Cetacea) शाकाहारी, जलचर पशू, यांना तुरळक केस असतात. उदा. देवमासा
  9. रिमी (Sirenia) हे सुद्धा शाकाहारी जलचर पशू आहेत, यांना केस नसतात.
  10. '''सीलार (Pinnipedea) सील आणि वल्लर प्राणी या श्रेणीत आहेत.
  11. शुंडावंत (Proboscidea) या प्राण्यांना सोंड असते. उदा. हत्ती
  12. अयुग्मखुरी (Perissodactyla) यांच्या पायांना विषमसंख्य खूर असतात. उदा. घोडा
  13. युग्मखुरी (Artiodactyla) यांच्या पायांना समसंख्य खूर असतात. उदा. गाय

सस्तन प्राण्यांमध्ये मांसाहारी, किटाहारी, शाकाहारी, कुरतडणारे (कृंतक) प्राणी असे विविध प्राणी आहेत.

मांसाहारी प्राण्यातील कुळे

संपादन

किटाहारी प्राण्यातील कुळे

संपादन

शाकाहारी प्राण्यातील कुळे

संपादन

कृंतक प्राण्यातील कुळे

संपादन