गेंडा

सस्तन प्राण्यांचे कुटुंब
(खड्गाद्य या पानावरून पुनर्निर्देशित)

गेंडा अथवा इंग्रजीत राईनोसिरोस हा प्राणी शाकाहारी भूचर आहे. खुरधारी वर्गातील हा प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. खुरधारी म्हणजे पायांना खुर असलेले प्राणी, तर अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खुर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणी आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून तो एक केसांचा गुच्छ आहे, जो शिंगात रूपांतरीत झाला.

गेंडा
एओसीन - अलीकडील
काळा गेंडा
काळा गेंडा
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: खड्गाद्य
ग्रे, १८२१
भारतीय एकशिंगी गेंडा

गेंड्यात सध्या पाच प्रकार असून आफ्रिका खंडात दोन प्रकारचे गेंडे आढळतात, एक काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात तीन प्रकारचे गेंडे आढळतात. भारत, नेपाळदक्षिण-पूर्व आशियाई देशात आढळतो.

आशिया खंडात या प्राण्याचा तीन मुख्य जाती आहेत जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि व्हियेतनाम देशात आढळतो, दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा, जो इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो, आणि तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किवा एक शिंगी गेंडा, जो भारत आणि नेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा ही जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.

भारतीय गेंडा

संपादन
मुख्य लेख: भारतीय गेंडा

भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगालउत्तर प्रदेश मध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळ मध्ये पण आढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोन प्रकार आहेत, पंढरा गेंडा आणि काळा गेंडा.