सुमात्रा
सुमात्रा हे इंडोनेशिया देशातील सर्वात मोठे बेट आहे. हे आकारानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचे बेट आहे.
सुमात्रा | |
---|---|
| |
सुमात्रा बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | ४,७३,४८१ वर्ग किमी |
लोकसंख्या | ५.०४ कोटी |
देश | इंडोनेशिया |
नावाची व्युत्पत्ती
संपादनप्राचीन काळात सुमात्राला सुवर्णद्वीप किंवा सुवर्णभूमी या संस्कृत नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणाऱ्या सोन्यामुळे असावे.[१] अरब नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव लामरी (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव समुद्र वंशाच्या राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणाऱ्या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.[२]
इतिहास
संपादनइ.स.पू. ५००च्या सुमारास ऑस्ट्रोनेशियन भाषा बोलणारी लोक सुमात्रात आली. भारत-चीन सागरी मार्गावर असल्यामुळे येथे त्यानंतर अनेक गावे वसलेली. विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील या वसाहतींवर भारतातील धर्मांचा प्रभाव होता.