ढगाळ बिबट्या (शास्त्रीय नाव: Neofelis nebulosa, निओफेलिस नेब्युलोसा ; इंग्लिश: Clouded Leopard, क्लाउडेड लेपर्ड) हा भारताच्या आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर राज्यातील तराईच्या जंगलात आढळणारा प्राणी आहे. याचा सर्वाधिक आढळ भूतानमध्ये आहे. ह्या प्राण्याला लामचित्ता असेही नाव आहे. 

ढगाळ बिबट्या
Neofelis nebulosa.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ
उपकुळ: पॅन्थेरिने
जातकुळी: निओफेलिस
जीव: नि. नेब्युलोसा
शास्त्रीय नाव
निओफेलिस नेब्युलोसा
(ग्रिफिथ, १८२१)
Clouded leopard.PNG
निओफेलिस नेब्युलोसा
इतर नावे

फेलिस मॅक्रोसेलिस
फेलिस मार्मोटा

वर्णनसंपादन करा

ढगाळ बिबट्या हा बिबट्या सदॄश दिसतो पण ठिपक्यांऐवजी त्याच्या अंगावर मोठे मोठे ब्लॉक असतात म्हणूनच याचे नाव ढगाळ बिबट्या असे पडले आहे. हा आकाराने खूपच लहान असतो व वजन जेमतेम २०-२२ किलोपर्यंत भरते. मांजरांमध्ये मार्जारकुळामध्ये सर्वात जाड शेपटी याची असते. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो व क्वचितच जमिनीवर उतरतो. त्याच्या जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. तो पिल्लांना झाडाच्या ढोलीत वाढवतो[२].

मार्जार कुळातील मोठ्या मार्जारांमध्ये व ढगाळ बिबट्यांमध्ये कवटीची रचना व दात या दोन बाबतीत तफावत असते. ढगाळ बिबट्याचे वरचे सुळे इतर मार्जारांपेक्षा जास्त विकसित असतात.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable
  2. ^ प्रेटर, एस.एच. द बुक ऑफ इंडिअन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)


बाह्य दुवेसंपादन करा



कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.