मुंगूस (कुळनाम : हर्पेस्टिडे) हे दक्षिण युरेशिया व मुख्य आफ्रिका खंडात आढळणाऱ्या मांसभक्षक, सस्तन प्राण्यांच्या ३३ प्रजातींचे कूळ आहे. मुंगसांच्या विविध प्रजातींमधील पूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांची लांबी प्रजातीगणिक १ ते ४ फूट (०.३० मी. ते १.२ मी.) आढळते. वजनाच्या दृष्टीने खारीएवढ्या दिसणाऱ्या व २९० ग्रॅमांएवढे वजन असलेल्या छोट्या मुंगसांपासून मांजरीएवढ्या आकारमान असलेल्या व ४ किलोग्रॅम वजनाच्या पांढऱ्या शेपटीच्या मुंगसापर्यंत प्रजातीगणिक वैविध्य आढळते. किडे,सरडे,पक्षी व अंडी,कृंतक,साप,मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे.

मुंगूस
सामान्य खुजे मुंगूस
सामान्य खुजे मुंगूस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: नकुलाद्य
बोनापार्ट, १८४५

सापांप्रमाणेच त्यांच्या संवेदी चेतातंतूंच्या टोकामधे फेरफार असतो, त्यामुळे त्यांना सापाच्या विषाविरुद्ध प्रतिकारक्षमता असते.[] शिवाय जाड कातडे व चपळता देखील त्यांना विषाविरुद्ध मदत करते. त्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी नाग व इतर विषारी सापांविरुद्ध संरक्षणासाठी मुंगसं पाळली जातात.

भारतीय करडे मुंगूस
पिवळे मुंगूस

वर्गीकरण

संपादन

संदर्भ

संपादन