काळवीट हे हरीण प्रामुख्याने भारतात आढळून येते. हे हरिणांच्या कुरंग हरीण कुळातील प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.

काळवीट

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
जातकुळी: Antilope
जीव: A. cervicapra
शास्त्रीय नाव
Antilope cervicapra
काळवीट

काळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंध्रप्रदेशात, व लगतच्या कर्नाटकात, राजस्थानातन व मध्यप्रदेशातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.

संदर्भ व नोंदी

संपादन