नीलगाय हे कुरंग कुळातील हरीण असून भारतात आढळते. नावात गाय असले तरी हा प्राणी हरीण कुळातील आहे, चेहऱ्यामध्ये थोडेसे गाईचे साम्य असल्याने व बहुतांशी रंग काळसर निळ्या रंगाच्या असतात त्यामुळे नाव नीलगाय असे पडले आहे, इंग्रजीत याला ब्लूबुल असे म्हणतात. गाईशी असलेल्या साम्यामुळे हे हरीण पवित्र समजले जाते व शिकार त्यामानाने कमी होते. हे हरीण प्रामुख्याने भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळते. राजस्थान व मध्य प्रदेश ह्या प्रदेशात सर्वाधिक वावर आहे.

नीलगाय

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: कुरंग हरीण
जातकुळी: Boselaphus
जीव: बो. ट्रागोकॅमलस
शास्त्रीय नाव
Boselaphus tragocamelus
पीटर पॅलास , १७६६
इतर नावे

नीलगाय, नंदीगाय, ब्लूबुल

नीलगाईचे मस्तक

सद्यस्थिती

संपादन

सद्यस्थितीत भारतात नीलगाईंची संख्या १ लाखाच्या आसपास असावी, भारताबाहेर अमेरिकेत टेक्सास व अलाबामा राज्यातही नीलगाईंची वाढ झालेली आहे. तेथे साधारणपणे १५ हजार पर्यंत संख्या असावी असा अंदाज आहे.

भारतात नीलगाईंची फारशी शिकार होत नाही. परंतु महामार्गांवर वाहनांच्या धडकेने खूपश्या नीलगाई मारल्या जातात. नीलगाईंच्या अस्तित्वाला सर्वात जास्त धोका त्यांचे अधिवासाचे क्षेत्र कमी झाल्याने आहे. आयुसीन तर्फे नीलगाईंची वर्गवारी मुबलक या वर्गात होते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ व नोंदी

संपादन