कुरंग हरणे (इंग्लिश: Antelope ) हे हरणांचे मुख्य उपकुळ आहे. या उपकुळात इम्पाला काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.

शिंगे

संपादन

कुरंग हरणांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे. ही शिंगे सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णतः वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहीत. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरेच लहान असते. मात्र, प्रत्येक जातीच्या हरणाच्या शिंगांचे आकारमान ठरावीकच असते. नरांची शिंगे मोठी असतात; माद्यांनाही बहुधा शिंगे असतात.