ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. एका वेळेला सशाची मादी २ ते ६ पिल्ले देते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचेही असतात. सफेद ससे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात. ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात.

ससा