भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरून पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.

सांबर

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: सारंगाद्य
उपकुळ: सारंग हरीण
जातकुळी: Muntiacus
जीव: M. muntjak
शास्त्रीय नाव
Muntiacus muntjak

याचा वावर पूर्व भारतात जास्त आहे. महाराष्ट्रातही याचा वावर बहुतेक जंगलात आहे. परंतु कोकणात याची नोंद विरळपणेच झालेली आहे. सह्याद्रीतील जंगलात बरेचदा हे हरीण दृष्टीस पडते.

संदर्भ

संपादन
  1. ^ Timmins, R.J., Duckworth, J.W., Hedges, S., Pattanavibool, A., Steinmetz, R., Semiadi, G., Tyson, M. & Boeadi (2008). Muntiacus muntjak. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 5 April 2009ला बघितले.Database entry includes a brief justification of why this species is of least concern.

भेकरास लहान शाखाविरहित शिंगे असून ती 15 सेमी पर्यंत वाढतात. शिंगांची वाढ डोकयावरील अस्थीमधून दरवर्षी होते. नर आपले वसतिस्थान आक्रमकपणे टिकवून ठेवतात. आपल्या परिसरात असलेला दुस-या नराचे वास्तव्य त्याना सहन होत नाही. आपल्या शिंगानी व वरील जबड्यातील सुळ्यांच्या सहाय्याने परक्या नराशी संघर्ष करतात. कुत्र्याचा प्रतिकार करताना शिंगे व सुळ्यांचा वापर करतात. भेकराच्या शरीरावर आखूड, मऊ, दाट केस असतात. शीत प्रदेशातील भेकराचे केस अधिक दाट असतात. ऋतुप्रमाणे केसांचा रंग गडद तपकिरी पासून पिवळट तपकिरीपर्यंत परिसरानुरूप बदलतो. ऊर्ध्व बाजूस असलेले केस सोनेरी गडद रंगाचे व पोटाकडील बाजू पांढरट रंगाची असते. पाय गडद तपकिरी व तांबड्या तपकिरी रंगाचे असतात. चेहरा गडद तपकिरी असतो. कानावरील केस अगदीच आखूड असतात. भारतीय नर भेकराची शिंगे अगदीच लहान म्हणजे 3-4 सेमी लांबीची असून मस्तकातून कशीबशी बाहेर दिसतात. मादीस नरास ज्या ठिकाणी शिंगे असतात त्या ठिकाणी लांब केस असतात. नराचे सुळे किंचित वाकडे 3 सेमी लांबीचे असून वरील ओठामधून जबड्याच्या बाहेर दिसतात. दुस-या नरास किंवा शत्रूस पिटाळून लावताना त्याचा पुरेपूर वापर होतो. नर मादीहून आकाराने मोठा असतो. नराची लांबी 100-110 सेमी असून उंची सु 40- 55 सेमी पर्यंत भरते. विस्तार दक्षिण आशियात भेकर विविध ठिकाणी आढळते. बांगलादेश, दक्षिण चीन, श्री लंका, नेपाळ, पाकिस्तान, कंबोडिया, व्हिएटनाम, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा, जावा,बाली व बोर्निओ येथे भेकराचा आढळ आहे. भारतीय भेकर उष्ण कटिबंधातील पानगळीची जंगले, गवताळ प्रदेश, व खुरट्या वनस्पति प्रदेशात आढळते. हिमालयाच्या उतारावर भेकर आढळले आहे. समुद्रसपाटीपासून तीनहजार मीटर उंचीपर्यंत यांचा वावर आहे. सहसा पाण्यापासून ते फार दूर जात नाही. नर आपल्या स्थाबद्दल चांगलाच जागरुक असतो. आपल्या परिसरात दुस-या नरास तो येऊ देत नाही पण माद्या अधून मधून दुस-या नराच्या आश्रयस्थानात वावरतात. भारतीय भेकराचे शास्त्रीय नाव Muntiacus muntjak असून याउपखंडात असलेली आणखी एक उपजाती M. m. aureus, या नावाने ओळखली जाते. वर्तन भारतीय भेकर महाराष्ट्रात भुंकणारे हरीण या सामान्य नावाने ओळखतात. संकटाची चाहूल लाहताच ते भुंकते. कधीकधी त्याचे भुंकणे तासभर चालू असते. मीलनकाळ सोडला तर पहिल्या सहा महिन्याच्या काळात पूर्ण वाढ झालेला नर एकांडा असतो. आपला परिसर निश्चित करण्यासाठी चेह-यावर डोळ्याखाली असलेल्या ग्रंथीमध्ये असलेला स्त्राव तो चेह-याच्या उंचीएवढ्या वाढलेल्या गवताच्या काडीवर घासतो. या गंध खुणेमुळे दुस-या नरास परिसरात आणखी एक नर असल्याचे समजते. या गंध खुणेमुळे मादीस नर जवळच असल्याची खात्री होते. मीलनकाळात दुस-या मादीच्या शोधात नर स्वतःचा परिसर सोडून जाणे ही सामान्य बाब आहे. भेकर अत्यंत सावध प्राणी आहे. धोक्याची जाणीव होताच भेकर भुंकते. भेकराचे भुंकणे हे मादीस आकर्षित करण्याची खूण आहे अशी समजूत होती. पण सध्या केलेल्या संशोधनातून भुंकणे हे धोक्याची जाणीव होताच दूर जाण्याचा संकेत आहे असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. परिसर स्पष्ट दिसण्यात अडचण आल्यास कधी कधी भेकराचे भुंकणे तासाभरासाठी चालूच राहते.