चिंकारा अथवा भारतीय गॅझेल (शास्त्रीय नाव: Gazella gazella bennetti) हे भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारे हरीण आहे. याची उंची ६० ते ६५ सेमी पर्यंत असते तर वजन साधारणपणे २०-२५ किलोपर्यंत असते. याची हरीणातील कुरंग गटात वर्गवारी होते. कुरंग हरीणांचे सर्व वैशिठ्ये या प्राण्यात दिसून येतात. पळण्याचा वेग, शिंगाची रचना, विणीचा हंगाम इत्यादी. परंतु इतर कुरंग हरीणांपेक्षा हे हरीण एकटे दुकटे फिरताना जास्त आढळून येते. जास्ती जास्त मोठा कळप ३-४ जणांचा असतो. चिंकारा हरीणांमध्ये माद्यांना हमखास शिंगे असतात. याचे नैसर्गिक शत्रू चित्तालांडगा आहेत. गुजरातमध्ये गीरच्या अभयारण्यात सिंह आहे . त्यातील भारतातून चित्ता नामशेष आहे तर लांडगे अत्यंत दुर्मिळ आहेत.

चिंकारा

प्रजातींची उपलब्धता
CD
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(विभाजीत खुरांचे)

कुळ: गवयाद्य
उपकुळ: कुरंग हरीण
जातकुळी: गॅझेला
जीव: गॅ.बेनेट्टी
शास्त्रीय नाव
गॅझेला बेनेट्टी
विल्यिम हेन्री सिकस, १८३१
''गॅझेला बेनेट्टी''
इतर नावे

चिंकारा
भारतीय गॅझेल

वावर

याचा वावर मुख्यत्वे राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र,कर्नाटकआंध्रप्रदेशातील दुष्काळी जिल्ह्यात आहे. भारताबाहेर याचा वावर पाकिस्तान, इराण या देशात आहे.पुण्याजवळ शिरुर तालुक्यात तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुका हा दिसून येतो.

वैशिठ्ये

अत्यंत शुष्क वातवरणाला या प्राण्याने जुळवून घेतले आहे. याची पाण्याची गरज अत्यंत कमी असते. विनापाणी अनेक दिवस चिंकारा जगू शकतो. त्याची शरीरात पाणी वाचवण्याची क्षमता अचाट असते. इतके की पाणी मिळाले नाही तर मुत्रविसर्जन हे केवळ खड्याच्या स्वरूपात करू शकतो.

भारतात चिंकाऱ्यांना वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वे संरक्षण मिळाले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला चिंकाराच्या हत्येसाठी शिक्षा झाली होती[]. सध्या त्यांची संख्या काळजी करण्या इतपत नसली तरी त्यांची संख्या कमी होत आहे.

संदर्भ

संपादन
  • Book of Indian animals by Oxford press
  • आपली सृष्टी आपले धन; निसर्ग प्रकाशन; मिलिंद वाटवे
  1. ^ http://www.indianexpress.com/story/212540.html चिंकारा हत्येबद्दल सलमान खानची सुनावणी