तरस
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.
तरस पूर्वीची मायोसीन ते अलीकडील | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारतातील पट्टेरी तरस
| ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
तरसाचा आढळप्रदेश
| ||||||||
उपकुळ व जातकुळी | ||||||||
इतर नावे | ||||||||
|
भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.
वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो
उपप्रजाती
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |