हयाद्य
हयाद्य किंवा अश्वकुळ (इंग्रजी:Equidae) हे एक सस्तन प्राण्याचे कूळ आहे. हे कूळ अयुग्मखुरी गणात मोडते. हय किंवा अश्व म्हणजे घोडा; त्यानुसार या कुळाचे नाव हयाद्य असे पडले. या कुळात घोडा, गाढव आणि झेब्रा अशा फक्त तीन प्रजाती शेष राहिल्या आहेत. इतर प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
हयाद्य | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
|
या प्राण्यांच्या पायाला एक खुर असतो. गवयाद्य प्रमाणे हे प्राणी रवंथ करत नाहीत. यांच्या जबड्यात सर्व दात आढळून येतात. पायाला एकच खुर असतो तसेच पाय उंच आणि काटक असतात. शरीर अरुंद, बांधीव आणि मजबूत असते. यामुळे हे प्राणी अतिशय वेगाने आणि लांबपर्यंत पळू शकतात. हे प्राणी गवत-पाला चावून खातात. यांच्या जठरात अन्नावर प्रक्रिया होऊन ते अन्न मोठ्या आतड्यात पचायला सुरुवात होते.
या प्राण्यांची मान लांब असून संपूर्ण मानेवर केस असतात. घोड्याची आयाळ व शेपटीचे केस लांब असतात. तर झेब्रा आणि गाढवाच्या शेपटीवर तुलनेने केस कमी असतात.