म्हैस हा एक सस्तन प्राणी आहे. हे दुधाळू जनावर आहे. नर म्हशीला रेडा म्हणतात. म्हैस हा प्राणी सर्वसाधारण काळ्या रंगाचा असतो. क्वचित, एखाद्या म्हशीच्या डोक्याचा थोडा भाग पांढरा असतो.

म्हैस
मुऱ्हा जातीची म्हैस
मुऱ्हा जातीची म्हैस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: bubalus
जीव: bubalis
शास्त्रीय नाव
Bubalus bubalis
Linnaeus, इ.स. १८२७
आढळप्रदेश
आढळप्रदेश
इतर नावे

Bos bubalis

भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसन चे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[१]आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.

लहानग्या रेड्याला टोणगा म्हणतात. म्हशीच्या नर पिल्लाला पारडू आणि मादी पिल्लाला पारडी असे म्हणतात.मराठवाड्यात ग्रामीण भाषेत नर म्हशीला 'हल्ल्या' असे म्हणतात.

जातीसंपादन करा

भारतात म्हशीच्या गावठी, जाफराबादी, पंढरपुरी, मुऱ्हा, मेहसाणा, नागपुरी, नीलीरावी, सुरती, बन्नी, बरगूर, भडवारी, छत्तीसगढी, चिलीका, गोजरी, कलहंडी, मराठवाडी, तोडा इत्यादी जाती आढळतात.

पहा : प्राण्यांचे आवाज

संदर्भसंपादन करा

  1. ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.