साप

एक सारपटणारा प्राणी

साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना असते, त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशी वर्गवारी होऊ शकते. सापांच्या डोक्याच्या कवटीमध्ये सांध्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते त्यांच्या जबड्यापेक्षा जास्त मोठे भक्ष्यदेखील गिळू शकतात, यामुळे अनेक सापांना दरवर्षी मारले जाते .

सापांशी निगडित अनेक गैरसमज आहेत. साप माणसांना खातो, साप डूक धरून बसतो व तो बदला घेतो, काही साप मेंददू खातात. पण ह्यांत काहीही तथ्य नाही. भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.

विविध जाती

संपादन

विषारी सापांची उदाहरणे

संपादन


बिनविषारी सापांची उदाहरणे

संपादन

सापांविषयी मराठी पुस्तके

संपादन
  • आपल्या भारतातील साप (मूळ इंग्रजी लेखक -रोम्युलस व्हिटेकर; मराठी अनुवाद मारुती चितमपल्ली)
  • महाराष्ट्रातील साप (खं.ग. घारपुरे) (१९२८)
  • सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स (वीणा गवाणकर)
  • सर्पपुराण (मधुकर विश्वनाथ दिवेकर)
  • सर्प मित्रांच्या सर्पकथा (विलास काणे)
  • सर्पविज्ञान (उल्हास ठाकूर)
  • साप (नीलमकुमार खैरे)
  • साप : आपला मित्र (प्रदीप कुळकर्णी)
  • साप : समज व गैरसमज (संतोष टकले)
  • साप आपले मित्र (राहुल शिंदे)
  • महाराष्ट्रातील साप (राहुल शिंदे)
  • सापांविषयी (मूळ इंग्रजी लेखक - झई आणि रोम व्हिटेकर; मराठी अनुवाद वसंत शिरवाडकर)
  • स्नेक्स ऑफ इंडिया (पी.जे. देवरस)
  • हिंदुस्थानातील साप (विष्णूशास्त्री चिपळूणकर) (१८९४)

संदर्भ

संपादन
  1. ^ "लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ पान क्र. १०". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ "लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ पान क्र. १०". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-11 रोजी पाहिले.