खापरखवल्या
अतिशय दुर्मिळ असा हा खापरखवल्या जातीचा साप आहे . हा बिन विषारी असून हा पावसाळ्यात जास्त आढळतो. ह्या सापला इंग्रजीत " फीप्संस शिल्ड्टेल " अस म्हणतात.
हा साप महाराष्ट्रात तो मुंबई, पुण्या जवळ डोंगराळ भागात तसेच सातारा, महाबळेश्वर, रायरेश्वर पठार आणि कर्नाटकच्या काही भागात आढळतो.
या सापाचा फीप्संस, एलोथ, मोठ्या खवल्याचा खापरखवल्या, महाबळेश्वरी खापरखवल्या अशा चार उपजाती आहेत.
हा साप जास्तीत जास्त 1 ते 2 फूट एवढा असतो . आणि डोक्यावर केशरी रंगाचा किवा गडद पिवळ्या रंगाचा डाग असतो.