वाळा (शास्त्रीय नाव: Ramphotyphlops braminus) हा आशियाआफ्रिकेत सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात. पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी कधी दिसतो. ओल्या जमिनीतील अळ्या किडे हे याचे अन्न आहे.

वाळा सर्प

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: टायफ्लोपिडे
(Typhlopidae)

जातकुळी: रँफोटायफ्लॉप्स (Ramphotyphlops)
जीव: रँ. ब्रामिनस
(Ramphotyphlops braminus)

शास्त्रीय नाव
रँफोटायफ्लॉप्स ब्रामिनस
लांबचे (वरचे चित्र) व नजिकचे (खालचे चित्र) दृष्य

वर्णन संपादन

वाळा साप लालसर तपकिरी रंगाचा असून याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सें.मी., तर अधिकतम २३ सें.मी. असते.

स्थानिक नावे संपादन

प्रजातीचे शास्त्रीय नाव हे ब्राह्मण या संस्कृत शब्दापासून घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात वाळ्याला 'दानवं','कणा', 'अंधासाप', 'सोमनाथ' या नावांनीही ओळखले जाते. गोव्यात याला 'टिल्यो' असे संबोधतात.

भौगोलिक आढळ संपादन

वाळा आशिया आणि आफ्रिकेत सापडतो. भारतात सर्वत्र वाळ्याचा वावर आढळला आहे. या प्रजातीची कोणतीही उपप्रजाती आतापर्यंत आढळून आलेली नाही.

वास्तव्य संपादन

वाळ्याचे वास्तव्य मऊ जमिनीत आढळते. पावसाने मऊ झालेली माती उकरण्यासाठी हा आपले डोके वापरतो. भारतामध्ये वाळा फक्त पावसाळ्यात जमिनीवर वावरताना दिसतो; इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.

खाद्य संपादन

मुंग्या, वाळवी, कीटकांची अंडी, अळ्या इत्यादी.

प्रजनन संपादन

वाळ्यांमध्ये अंड्यांद्वारे प्रजनन होते. सर्वसाधारणतः ३-७ तांदळाच्या आकाराची अंडी घातली जातात.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: