परिवर्तन साहित्य संमेलन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
२ रे परिवर्तनशिल साहित्य संमेलन
संपादनयेरंडीच्या वतीने परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर परिवर्तनशिल साहित्य संमेलनाचे आयोजन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले होते. संमेलनाध्यक्ष लेखक व गायक अनिरुद्ध वनकरहे होते संमेलनाचे उदघाटन अभियंता मोरेश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजकुमार बडोले, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, राजेश नंदागवळी, उदय चक्रधर, संजय ठवरे, दिलवर रामटेके, एकनाथ नंदागवळी उपस्थित होते. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुन्नाभाई नंदागवळीने यावेळी मार्गदर्शन करताना साहित्य कसे असले पाहिजे, निर्भीड असले पाहिजे असे सांगितले. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील परिवर्तन साहित्य संमेलनाचे गायक व कवी अनिरुद्ध वनकर यांच्या हस्ते कवींचा व गायकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. साहित्यिकांना व गायकांना शासनाकडून मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले.
कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी खेमराज भोयर यांनी केले संमेलनाला कवयित्री रझिया पठाण, कांदबरीकारअनंता सूर, खेमचंद रंगारी, कवी भीमानंद मेश्राम, गणेश सांगोडकर यांनी त्यांच्या एकापेक्षा एक चांगल्या कविता सादर केल्या. सर्व कवींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चौथ्या टप्प्यामध्ये कैलाश बोरकर यांच्या एक रात्र ’निळ्या नभाखाली’ या कार्यक्रमातर्गंत वैदर्भीय गायक कैलास बोरकर, सौ. सुलभा खोब्रागडे यांनी यावेळी अनेक गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाकरिता सरपंच लीला लोथे, तंटामुक्त अध्यक्ष मनोहर लोथे, सिद्धार्थ उके, शैलेश मोटघरे, आनंद बौद्ध, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. "