विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी
एक नम्र विनंती
इथे लिहिणारी सर्वच संपादक, लेखक मंडळी कधी ना कधी नवीन होती, इथे प्रत्येकानेच इतर सदस्यांकडून माहिती घेत घेतच वाट काढली आहे. कृपया, येथील नियमांची कुठेही धास्ती वाटून न घेता निःसंकोचपणे संपादन, लेखन व वाचन करत रहावे.
लेखन प्रयोग
संपादनबहुतेक सर्वच मंडळींना मराठी विकिपीडिया मराठी भाषेकरिता किती महत्त्वाचा आहे याची जाणीव असतेच. त्यामुळे येथे कोणताही मराठी माणूस जाणीवपूर्वक गैरलेखन करणे निश्चितपणे टाळतो.
बहुतेक वेळा, असे खरेच होते का? इथे मराठीत लिहिले तर दिसते का? अशा प्रकारचे प्रयोग करून पाहिले जातात. काहीच न लिहिण्यापेक्षा किंवा अजिबात सहभागी न होण्यापेक्षा अशा प्रयोगांचेही आम्ही स्वागतच करतो. इतकेच नाही तर त्यांच्या पानावर साहाय्य चमूचे सदस्य {{बदलाबिनधास्त}} नावाचा विशेष अभिनंदनपर संदेशही देत असतात.
अर्थात, प्रारंभिक प्रायोगिक संपादन धूळपाटी पानावर करून पाहिलेत तर इतर अनुभवी संपादकांचा अनपेक्षित ठिकाणी दुरूस्त्या करण्यात जाणारा वेळ वाचून ते त्यांच्या इतर महत्त्वाच्या कामात लक्ष घालू शकतात. त्याशिवाय, धूळपाटीवर नवीन सदस्यांना खास मदत करणे सोपे जाते. सहकार्याच्या अपेक्षेने आगाऊ धन्यवाद.
रिकामी ओळ वाढविणे
संपादनएखाद्या ओळी नंतर कळफलकावरील 'एंटर की' वापरून दोन ओळीत एखादी रिकामी ओळ जोडण्याचा प्रयत्न प्रारंभिक संपादने करणाऱ्यांकडून करून पाहिला जातो. यात लेख किंवा पानात कोणतीही लक्षणीय त्रुटी संभवत नाही हे खरे आहे, परंतु काही लक्षणीय फरक न जाणवणारा बदल करून पहाण्यापेक्षा, एखाद्या शब्दाचे किंवा ओळीचे लेखन करून पहाणे अधिक सयुक्तिक असते.
लेखात दोन वा अधिक बरोबरच्या चिन्हामध्ये(=== या प्रकारे) दिलेले दोन विभागच असतील तर त्यात एखादी ओळ वाढवल्याने तर कोणताच दृश्य परिणाम जाणवत नाही. एखादे लेखन नवीन ओळीत किंवा नवीन परिच्छेदाने करावयाचे झाल्यास मध्ये रिकामी ओळ सोडणे चांगले.
- उदाहरणादाखल : हे चित्र पहा
बरोबर चिन्हाच्या अलीकडे लेखन
संपादनअशी == बरोबरची चिन्हे लेखातील नवीन परिच्छेदास( किंवा विभागाचे नाव) देण्याकरिता असतात. साधारणतः आपल्या हातून काही चूक होऊ नये या दृष्टीने नवागत सदस्य एखादे अक्षर बरोबर चिन्हाच्या अलीकडेच लिहून पहातात आणि जतन केल्यानंतर परिच्छेद तुटल्याचे लक्षात येऊन नेमकी गोची होते. ज्या ओळीत ===बरोबर चिन्हाच्या अलीकडे लेखन=== असे बरोबरच्या चिन्हात मजकूर आहे, त्या ओळीत लिहिण्याचे टाळावे म्हणजे तुम्ही गोंधळणार नाही.
- उदाहरणादाखल : हे चित्र पहा
परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतील पहिला शब्दाच्या अलीकडे समास/रिकामी जागा(स्पेस)
संपादनपरिच्छेदातील पहिल्या ओळीत, एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहिण्यास चालू केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.
परिच्छेदातील पहिल्या ओळीतील पहिला शब्द, एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून चालू केल्यास तो येथे दर्शविल्या प्रमाणे प्रमाणे वेगळा दिसतो.
एक तर पहिल्या शब्दाच्या अलीकडे जागा(स्पेस) न सोडता लेखन चालू करू नये अथवा स्पेस हवीच असल्यास ; आपल्याला हे लेखन एक किंवा जेवढी अक्षरे सोडून करावयाचे असेल तेवढे शब्दाच्या अलीकडे हवे तेवढी विसर्ग चिन्हे : ओळीतील पहिल्या शब्दाच्या अलीकडे लिहावीत म्हणजे अशी त्रुटी उद्भवणार नाही.
::परिच्छेदातील पहिल्या ओळीत एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहायला सुरुवात केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.
हे खालीलप्रमाणे दिसेल.
- परिच्छेदातील पहिल्या ओळीत एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहायला सुरुवात केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.
इंग्रजीत लिहिण्याचा प्रयत्न
संपादनमराठी विकिपीडियावर डिफॉल्ट स्क्रिप्ट देवनागरी आहे याची कल्पना नसताना घाईत इंग्रजीतील वाक्य लिहून पान जतन केले जाते. मजकूर अवाचनीय होतो आणि उत्पात (spam) समजून इतर सदस्यांकडून वेगाने त्वरित वगळला जातो. जर तुम्हाला इंग्रजी लिपीत मत नोंदवायचे असेल तर संपादन खिडकीच्या वरील डबीत बरोबरचे चिन्ह दिसेल तिथे टिचकी मारून किंवा Esc बटन दाबून आपण लिहावयाची भाषा बदलू शकता.
पण या लेखात पुढे नमूद केल्याप्रमाणे शक्यतो चर्चा पाने सोडून इतरत्र इंग्रजीचा वापर टाळा; खासकरून लेखांची नावे काही सन्मान्य अपवाद वगळता मराठीतच लिहावीत असा संकेत आहे.
लेखात लिहिताना एखाद्या इंग्रजी शब्दास मराठीत काय म्हणतात माहीत नसल्यास , शब्द इंग्रजीत लिहून पुढे {{मराठी शब्द सुचवा}} असे लिहिल्यास चालते आणि ते suggest [मराठी शब्द सुचवा] असे दिसते.
एखाद्या लेखाच्या प्राथमिक स्वरूपात, भाषांतराकरिता मोठ्या प्रमाणावर इंग्रजी ठेवून ते वापरावयाचे असल्यास {{भाषांतर}} हा साचा लावा.
इंग्रजी शीर्षक लेखन
संपादनइंग्रजी शीर्षक लेखन करणाऱ्या सदस्यांच्या चर्चा पानावर {{Marathihelp}} साचा वापरता येतो.
हा मराठीभाषी विकिपीडिया असल्यामुळे येथील लेखन प्राधान्याने मराठीतच होणे अपेक्षित आहे. मराठी विकिपीडिया मराठी भाषा द्वितीय भाषा म्हणून वापरताना अडचण येणाऱ्या व्यक्तींकरिता सविस्तर साहाय्य मिळवून देते. येथे मराठी फ़ॉन्ट्सची यादी आहे. त्याशिवाय local sandbox/धूळपाटी येथे लेखनावर प्रयोग करून पहाता येतात.
अशा सदस्यांना आपण भाषांतर प्रकल्पात आमंत्रित करू शकतो तसेच त्यांना काही भाषांतर करून हवे असेल तर {{translate}} साचा वापरता येतो.
हे लक्षात घ्या की, काही आवश्यक अपवाद वगळले तर लेखांची नावे मराठी भाषेतच असायला पाहिजेत.
शब्द हिन्दी आहे आणि मराठीत प्रचलित नाही याची कल्पना नसणे
संपादनउदाहरण:
- भारतीय उपन्यास भारतीय साहित्य विधे मध्ये उपन्यास ही एक महत्त्वपूर्ण विधा आहे
मराठी विकिपीडियाची फोनेटिक टायपिंग माहीत नसणे
संपादनअशा सदस्यांच्या चर्चा पानावर {{Fonthelp}} साचा वापरता येतो उदाहरण:
- मोथे नुलकसन् अहे
स्वतःचे नाव लिहिणे
संपादन- लेखात स्वतःचे नाव लिहिणे किंवा ~~~~ सही करणे.
- विकिपीडिया लेख हे सर्वांनी मिळून लिहिण्याची सहयोगी पाने आहेत. त्यामुळे कुणा एकाचेच नाव दिसणे प्रशस्त दिसत नाही.
- त्या शिवाय प्रत्येक संपादकाचे सदस्य नाव लेखाच्या 'इतिहास' पानावर आपोआप जतन होत असतेच.
- त्याशिवाय एखाद्या व्यक्तिविषयक/संस्था/पंथ विषयक लेखात स्वतःचे नाव शिष्य/अनुयायी यादीत लावण्यासारखे संपादन होऊ शकते.( असे संपादन इतर संपादकांना विकिपीडियाचा दर्जा टिकवण्याच्या दृष्टीने तातडीने परतवणे भाग पडते)
- स्वतःचे नाव स्वतः टाकू नये, इतर कुणाला सांगून टाकून घेऊ नये, संदर्भ असावा, नमूद करण्याजोगे- (notable)- (महत्त्वाचे किंवा प्रसिद्ध) असावे, विकिपीडिया लेखांची आणि लेखात येणारी नावे स्वप्रसिद्धीकरता टाकली जाऊ नयेत (स्वतःची स्वतः तर टाकूच नयेत).
- काही वेळेस लेख संपादन करणारी व्यक्ती स्वतः नमूद करण्याजोग्या- (notable)- (महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध) श्रेणीत मोडते, पण तरीसुद्धा स्वतःचे नाव स्वतः टाकू नये, हा संकेत महत्त्वाचा आहे.
- अर्थात, आपण जेव्हा एखाद्या चर्चा पानावर चर्चेत सहभागी होत असता तेव्हा मात्र आपण ~~~~ सही करणे अपेक्षित असते. न टाकल्यास, त्या चर्चेचे उत्तर, चर्चेची प्रतिक्रिया, मग कोणास द्यावी हा प्रश्न उद्भवतो.
विभाग
संपादनविकिपीडियात खालील अशा ------- सिंगल डॅशचा उपयोग कमीत कमी करावा असा संकेत आहे. कारण तो संपादकांना आपापसात संभ्रमित(कन्फ्यूज) करतो असे आढळून आले आहे.
साधारणपणे, नवीन विभागाकरीता शीर्षक न आठवल्यामुळे असे होत असावे. आपण लिहिलेल्या संदेशातीलच एखादा शब्द == == मध्ये टाकावा. किंवा बरोबरचे चिन्ह == नवीन विभाग== किंवा ==माझे मत== किंवा ==साहाय्य हवे==
त्याशिवाय सदस्य नाव कळफलकाच्या(की बोर्डच्या) डाव्या वरच्या कोपऱ्यातील (1) च्या डावीकडील तरंग चिन्ह् चार वेळा ~~~~ असे लिहावे नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. नाव आणि वेळ आपोआप उमटते. माहीतगार ०७:०८, २४ ऑगस्ट २००९ (UTC)
अलंकृत लेखन आणि विशेषणांचा वापर
संपादनविकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश आहे. तो शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो आणि नंतर विकिपीडियाच संदर्भ म्हणून वापरला जातो. त्यासाठी माहिती निव्वळ वस्तुनिष्ठ (फॅक्ट) असावी लागते. अलंकृत भाषा आणि विशेषणांच्या वापराने बऱ्याचदा वाचक, तो लेख किंवा विकिपीडिया एखाद्या व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करतो(soft corner), असे समजू शकतो आणि लेखाची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका असतो. विश्वासार्हता धोक्यात येण्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता बळावते.
प्रत्येक वाचक स्वतःचे मत स्वतः बनवण्यास समर्थ असतो. अधिकात अधिक विश्वासार्ह माहिती वाचकास पुरविल्यास त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो.
व्यक्तिगत दृष्टिकोन आणि पूर्वग्रह
संपादनलेखात स्वतःला वाटणारा कोणत्याही गोष्टीचा अभिनिवेश, व्यक्तिगत अभिमान, द्वेष काहीही व्यक्त करणे उचित नाही. तसेच तुम्हाला तुमचे व्यक्तिगत दृष्टिकोन स्वतःच्या सदस्य पानावर मांडण्याचे पुरेसे स्वातंत्र्य असते.
वर 'विशेषणांचा वापर' मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिगत दृष्टिकोन मांडण्याचा आग्रह आणि पूर्वग्रह किंवा एकांगी लेखन टाळावे. असे न केल्यास, लेखाची विश्वासार्हता कमी होऊन फायद्याऐवजी नुकसानच होण्याचा धोका संभवतो.
- काही वेळा आपली माहिती वस्तुनिष्ठ असते परंतु नेमका संदर्भ हाताशी नसल्यामुळे किंवा न आठवल्यास, लेखन करावे परंतु स्वतःच्याच लेखनाशेजारीसुद्धा {{संदर्भ हवा}} साचा लावावा.
उदाहरणे:
- जैविक विविधता ही एक आतिशय महत्त्वाची संकल्पना आहे.
- .....हे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. "जे बोलतो ते करूनही दाखवतो"
असे करा आणि सल्ले
संपादन"असे करा" लिहिणे टाळावे. ते व्यक्तिगत मत होते. "असे करा" हे एखादी गोष्ट कशी करावी किंवा सल्ले सांगणारी असेल तर लिखाण विकिबुक्समध्ये (विकिपीडियाच्या सहप्रकल्पात) करावे.
विकिपीडियात "असे केले जाते" असे संदर्भासहित लिहिणे काही वेळा जमण्यासारखे असते.
गरज आहे
संपादनविकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे. विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे,प्रबोधन/ ॲडव्होकसी(जाहिरातीच्या) दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. विकिप्रकल्पात अभिप्रेत नसलेली वाक्य उदाहरणे:
एकत्र येवून ही योजना पूर्वपदावर आणण्यास राजकारण विसरुन पुढे येण्याची गरज आहे.-मराठी भाषेचे शिक्षण देणं हेही मराठी भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांची फार मोठी गरज आहे,यांचा आदर्श समाजासमोर निर्माण करणे आज काळाची गरज आहे. नव्हे ती चीच गरज आहे.खर्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. , ही भावना निर्माण करण्याची फार मोठी गरज आहे.दूरदृष्टी असणाऱ्या तसेच लोकाभिमुक नेत्याची गरज आहेजीवनाच्या प्रगतीकरीता ज्या अनेक गोष्टींची गरज आहे
संदर्भांचा अभाव
संपादन- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- संदर्भ टॅग <ref> ने सुरू होतो </ref> ने संपतो.
- < > / हि चिन्हे संगणक कळफलकाच्या (काँप्यूटर किबोर्डच्या) खालच्या बाजूस उजवीकडे असतात.
संदर्भाच्या अभावाची उदाहरणे
संपादन- हा तालुका नेहमीच राजकारणात अग्रेसर आहे
- या गावात अनेक प्रसिद्ध व्यक्ती जन्मलेल्या आहेत.
- तेल आणि तूप एकत्र करून खाऊ नये ते तब्येतीस अपायकारक असते.
- ...व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. (...व्यसनमुक्ती क्षेत्रात
निरलसपणेकार्य करणारे नानासाहेब यांचेजगभरात लाखोअनुयायी आहेत.... ऐवजी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे नानासाहेब यांचे असंख्य अनुयायी आहेत....<ref>इथे उपयुक्त असंख्य अनुयायी असल्याचा संदर्भ देता आल्यास पहावे</ref> अथवा स्वतःच्याच वाक्यापुढे {{संदर्भ हवा}} हा साचा लावावा म्हणजे तो [ संदर्भ हवा ] असा दिसेल. संदर्भ तुम्ही स्वतःच दिले पाहिजे असे नाही कालाच्या ओघात इतरांनी दिले तरी चालतात पण आपण देतो ती माहिती वस्तुस्थितीला धरून आहे ना याकडे स्वतःहूनच लक्ष ठेवावे )
चुकीच्या लेखात लेखन
संपादनबऱ्याचदा क्रिकेटबद्दलच्या लेखात केवळ सचिन तेंडुलकरबद्दल किंवा सचिन तेंडुलकरच्या लेखात सहवागबद्दल किंवा क्रिकेटबद्दल सर्वसाधारण माहिती लिहिली जाऊ शकते.
[[दुव्याचे शीर्षक]] चौकटी कंस वापरून प्रत्येक विषयावर वेगळा लेख बनवता येतो हे माहीत नसल्यामुळे किंवा साधारणतः विषयाबद्दल ललित लेखनास रोचक बनवण्याकरिता थोडे विषय सोडून भरकटून वापस आले तरी चालते, ललित लेखन करणाऱ्या व्यक्तींकडून असे घडू शकते.
नवी व्यक्ती अशा स्वरूपाचे लेखन करताना दिसली तर इतर सदस्यांनी दुवे निर्माण करून ते लेखन सुयोग्य लेखात स्थानांतरित करून देऊन मदत करावी. कारण दुवे देणे सहज आणि सोपे असले तरी सवय नसलेल्या व्यक्तीस ते क्लिष्ट(त्रासदायक) वाटू शकते.
लेखक किंवा कवीचे कविता किंवा प्रत्यक्ष लेखन उपलब्ध करणे
संपादनपुस्तके किंवा वृत्तपत्रांतून आलेल्या लेखकांचे लेख किंवा कवींच्या कविता किंवा प्रत्यक्ष पूर्ण लेखन जसेच्यातसे उपलब्ध करणे हे प्रताधिकारांच्या (कॉपीराइट) कायद्यांबद्दलच्या सामाजिक अनभिज्ञतेमुळे होते. अशा चुकांचे प्रमाण आता विकिपीडियात खूपच कमी झाले आहे.
साधारणतः चालू वर्ष २०२४-६० = इ.स.१९५२ पूर्वी मृत किंवा निनावी प्रकाशित लेखन प्रताधिकारमुक्त असते. त्याशिवाय इतर लेखनास प्रताधिकाराची मालकी ज्याच्याकडे असेल त्याची अनुमती घेणे अपेक्षितआहे.
लेखन प्रताधिकारमुक्त केले गेल्यास विकिस्रोत सहप्रकल्पात जाणे अपेक्षित आहे, न पेक्षा, विकिबुक्समध्ये गेले तरी चालते.
डायरी/अनुदिनी प्रकारातील व्यक्तिगत लेखन
संपादन
उदाहरणे:
संपादनचिन्ह साधनांचा वापर
संपादन
संपादन खिडकीच्या वर किंवा खाली असलेल्या अशा खूणेवर माऊसने क्लिक केले गेले आणि ते आपल्या अनवधानाने घडलेल्या क्लिकमुळे आहे हे अशा नवीन संपादकाच्या लक्षात येत नाही.नवीन व्यक्तिंच्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत करत त्यांना सुयोग्य सहाय्य पुरवून प्रोत्साहीत करण्याकरिता; अशा वेळी, नवीन संपादकाच्या चर्चा पानावर लावण्यासाठी {{बिनधास्तबदला}} सहाय्य साचा लावावा. |
नवीन सदस्यांनी वरील सर्व चिन्हे धूळपाटी पानावर जरूर वापरून् पहावीत या चिन्हांमुळे तुमची संपादनातील कामे खूप हलकी होतील आणि वेळही वाचेल.
मराठी ( खासकरून मराठी/हिन्दी विकिपीडिया ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी
संपादनकोलन आणि विसर्ग मधील फरक
- स्वतःमधील विसर्ग चिन्ह हे त्या अक्षराचा भाग आहे. :वर्ग: इथे कोलन वापरले आहे. इथे र्ग आणि : वेगवेगळे कॉपी पेस्ट करता येतील. कारण येथे वर्ग शब्दाचे लेखन संपले असता मराठी फाँट बंद केला आणि कोलन : नंतर केवळ इंग्रजी फाँट चालू असताना टाईप केला आहे.
- वर्गीकरणे करताना वर्ग:विराम चिन्हे हे कोलन वापरल्यामुळे एक बरोबर वर्ग पाना कडे जाईल पण वर्गःविराम चिन्हे विसर्गाने बनलेले पान चूक असेल.
तर वर्गः इथे र्गः हे एकच विसर्ग अक्षर आहे. वेगवेगळे कॉपी पेस्ट होत नाही.
मराठी ( खासकरून मराठी/हिन्दी विकिपीडिया ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी २
संपादनखालील अक्षरे कशी लिहावीत याची कल्पना नसल्याने बऱ्याचदा शुद्धलेखन त्रुटी उद्भवतात. अकारांत शब्दातील शेवटच्या अक्षरानंतर a टाईप करण्याचे राहील्यास हेच वाक्य अकारांत् शब्दातील् शेवटच्या अक्षरानंतर् a टाईप् करण्याचे राहील्यास् असे दिसते. खास करून तुम्ही नवीन तयार केलेल्या लेख नावात अशी चूक नजर चूकीने झाली तर काही वेळेस लगेच लक्षात न येऊन आपला लिहिलेला लेख शोधण्यात विनाकारण वेळ जातो.
- ऱ्य कसा लिहावा?
- r+y+a र्य
- rr+y+a ऱ्य
- y+r+a य्र
- इकडे लक्ष द्या
- ण Na (कॅपिटल N वापरा na ने न असे उमटते)
- छ chha
- ज्ञ jnja (ज् [j]+ ञ[nja] = ज्ञ)
- क्ष Xa किंवा kshha
- ष Sh किंवा shh
- ङ nga
- ॲ a^
मराठी ( खासकरून बराहा ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी
संपादन- मोडी लिपी कालीन । ओवी अभंगाच्या ओळीत वापरले जाणारे दंड चिन्ह
- बराहाफॉंट मराठी लेखन चालू असताना वापरून । चिन्ह[[:वर्ग:विराम चिन्हे।विरामचिन्हांचे वर्ग ]] असे वापरले
- वर्ग:विराम चिन्हे।विरामचिन्हांचे वर्ग तर असे चूक दिसेल.
- विकि भाषेतील सुयोग्य चिन्ह | असे थोडे जास्त उंचीचे असते.
- बराहाफॉंट F11/F12 वापरून मराठी बंद ठेवून इंग्रजीचालू असताना | चिन्ह[[:वर्ग:विराम चिन्हे|विरामचिन्हांचे वर्ग ]] असे वापरले
- विरामचिन्हांचे वर्ग तर असे बरोबर दिसेल.
१) ओ कार लिहिताना केवळ o पूरे. हो लिहावयाचे झाल्यास ho . Capital O टाळावा कारण ते कन्नडमधल्या एकारान्त प्रकार-२( जे एकार आणि ओकार मधील मराठी व्याकराणात न स्विकारला जाणारा उच्चार हॊ ) चे देव नागरी रूप आहे. शोध यंत्राकरिता(search) दोन्ही वेगळे आहेत हॊळकर लिहून होळकर लेखावर पोहोचता येणार नाही.
२) असेच जरासे फ चेही आहे ph लिहून फ बनवावा. ( F ने येणारा फ़ टाळावा. हिन्दी आणि ऊर्दू करिताचा टिंब यूक्त (ज्यास 'नुक्ता' म्हणतात)असलेले वेगळे उच्चारण आहे.मराठी करता वस्तुत: फ़ वापरण्याने बिघडण्या सारखे काही नाही, परंतु शोध यंत्रे हिन्दी ला समोर ठेवून बनतात.त्यामुळे कोणास अडचण होउ शकते.
अविश्वकोशिय वार्तांकन प्रयोग
संपादनआढळते/आढळतो/आढळून आले , दिसते, दिसून येते
अविश्वकोशिय प्रमाणपत्र
संपादन- यामुळे त्या विभागांची गोडी अधिक वाढलेली दिसते
- खास, आकर्षण
- ग्रामीण भागात, खास करून जत्रा किंवा आठवडे बाजारात, हे चित्र आपणांस हमखास बघावयास मिळते.
पूर्वलक्षी/प्रभावी विश्लेषण तर्क आणि निष्कर्ष
संपादनसंबंधित विषयाबद्दल आत्मीयतेमुळे अथवा पूर्वग्रहांमुळे, अभिप्रेत निष्कर्ष मनात आधीच ठेऊन अथवा निष्कर्षाप्रत येण्याची घाई करून; बऱ्याचदा इतरांची मते आपल्या मतांनी प्रभावित करण्याच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उद्देशाने पूर्वलक्षी/प्रभावी विश्लेषण तर्क आणि निष्कर्षांची मांडणी विकिपीडीया निष्पक्षता तत्वास धरून नसते.
तार्किक उणीव
संपादनअशा लेखनात बऱ्याचदा तार्किक संगतींचा अभाव अथवा तार्किक उणिवा असू शकतात.
जाहिरात करणारे अविश्वकोशिय शब्द प्रयोग
संपादन- विकिपीडीया लेखाच्या वाचकास संबोधन -वाचकहो,वाचकांना, तुम्ही/आपण तुम्हाला/आपणास
अपूर्ण आणि मोघम वाक्ये
संपादनजनरलायझेशन
संपादनहितसंघर्ष, हितसंबंध आणि औचित्यभंग
संपादनश्री./श्रीमती. नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
{{{संदेश}}} |