सहाय्य:नेहमीचे प्रश्न
- हे पान मुख्यत्वे मदतकेंद्रावर झालेल्या प्रश्नोत्तरांवर आधारीत आहे. इतरत्र नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचाही अंशत: समावेश आहे.
देवनागरी लिपी संगणकावर प्रतिस्थापित कशी करावी?
संपादनThe Frequently Asked Questions about Devanagari setup are located here...
देवनागरी लिपी संगणकावर प्रतिस्थापित करण्याविषयीचे नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न येथे उपलब्ध आहेत आणि ती सध्या केवळ इंग्रजी आवृत्ति आहे.
विकिपीडियावर मराठीत डायरेक्ट टाईप का करता येत नाही(मराठी कळपट का नाही)?
संपादन- ऊ.पहा आणि चर्चा करा चावडी/विकिपीडियात कळपट हवा
विकिपीडियावर लेखन कसे करावे?
संपादनमराठी लेखन नीट दिसत नाही.
संपादन
मराठी अक्षरे फायरफॉक्स् मधे नीट दिसत नाहीत.
संपादन
मराठी शुद्धलेखन विषयक प्रश्न.
संपादनहयात व्यक्तींबद्दलच्या लेखातील त्रुटी दुरूस्त करण्याचे मार्ग
संपादनलेखाचे नाव देणे, बदलणे, इंग्रजी नावांचे/शब्दांचे मराठी लेखन कसे करावे?, साररख्या नावांचे नि:संदग्धीकरण इत्यादी संबधीत प्रश्न
संपादनसदस्य खाते नावाचे मराठीकरण
संपादनमाझे नाव मराठीत का दिसत नाही?
संपादननमस्कार! विकिपीडियावर ABCD नावाने सदस्य खाते उघडले आहे.
नमस्कार ABCD, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! ...
यात माझे नाव ईंग्रजीत का दिसते हा माझा प्रश्न होता. मराठी नावाविषयी तुम्ही मला जास्त सांगु शकाल काय? मी आता 'ABCD' बदलून 'अबकड' हे नाव कसे धारण करु?
- पर्याय १) सदस्य खाते नाव न बदलता माझ्या पसंती>> "टोपणनाव" येथे आपल्या आवडीचे टोपणनाव निवडू शकता.
- पर्याय २) नवे खाते उघडावे व सदस्य नाव मराठीत नोंदवावे
- पर्याय ३) खाते नाव बदलण्याकरता येथे प्रशासकांकडे नावात बदल विनंती करावी.शक्याशक्यते बद्दल अधिक माहिती तिथेच उपलब्ध केली जाऊ शकेल.
वर्गीकरण
संपादनमला इंग्लिश चित्रपट नामसूची या वर्गात एक नवीन लेख द्यायचा आहे. नवीन लेख तयार केल्यानंतर त्याचा दुवा या वर्गात कसा देता येईल?
संपादन- लेखाच्या शेवटी [[वर्ग:इंग्लिश चित्रपट नामसूची]] असे लिहिले असता लेख आपोआप त्या वर्गात समाविष्ट होइल.
कॉपीराईट उल्लंघन
संपादनकुसुमाग्रज या पानावर त्यांच्या माहितीऐवजी त्यांच्या केवळ कविता देण्यात आल्या आहेत.याबाबत कॉपीराईटचा भंग झाला आहे काय? मी माहिती जमवत असलेल्या इंदिरा संत यांच्या लेखातही काही कवितांची उद्धरणे देता येतील काय?
संपादन- लेखक किंवा कवीचा लेखन प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास समीक्षण तुलनात्मक समीक्षण करण्याच्या दृष्टीने उद्धरणे देणे योग्य आहे । सद्यस्थितितील कुसुमाग्रज लेख खरेच प्रताधिकार कायद्यातील नियमास धरून नाही ; दुसरे तर तशी प्रताधिकार मुक्ततेची परवानगी मिळवली तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात संपूर्ण लेखन जसेच्या तसे देता येते;विकिबूक्स या सहप्रकल्पात कौसुमाग्रजांच्या कविता शिकवता येतील तर विकिविद्यापीठ सहप्रकल्पात त्यांच्या कवितांबद्दलची प्रश्नोत्तरे अंतर्भूत करता येतील. सुयोग्य लेखात गोविंद विनायक करंदीकर हा लेख उदाहरणा करिता पहावा ।
कुठे विचारावे
संपादनशंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का?
संपादन- शंका येथे मदतकेंद्रात ,चावडीवर आणि संबधीत लेखाविषयीच्या शंका लेखाच्या चर्चा पानावर तातडीच्या प्रबंधकीय मदती करिता प्रचालकांच्या चर्चापानावर शंका विचारू शकता.
सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
संपादन- संबधीत सदस्यांच्या चर्चापानावर संपर्क करून
सही
संपादनसही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
संपादन- सही बद्दल अधिक माहिती Wikipedia:Signaturesयेथे वाचा .
मराठी विकिपीडियात कसे लिहावे
संपादनI would like to write in Marathi विकिपीडिया. I am interested in writing for Marathi Wikipedia. How should I go about it? I have become a member of this just now. Kindly help me.
संपादनविकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार ~~~~; वापरुन आपली सही नोंदवावी.
मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
संपादन[ चित्र हवे ] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
- लेखामध्ये [[चित्र:<imagename>.<extension>]] असे लिहावे. उदा. [[चित्र:Yes.png]] लिहिल्यास असे दिसेल: To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs. Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.
How can I add images on Marathi wikipedia which are already available on English version? How can I use that link? I tried few things but those didnt work.
संपादन- केवळ commons मधील उपलब्ध छायाचित्रे इतर विकि प्रकल्पात वापरता येतात.प्ररंतु एका भाषेतील विकिप्रकल्पातील संचिका दुसर्या प्रकल्पात सरळ आयात करता येत नाहीत त्या करिता अशी संचिका आपल्या संगणकावर उतरवून पुन्हा चढवावी लागते.
विकिपिडियावर छायाचित्रे/चित्रे ? संचिका कशी चढवावी? नव्या इमेज कशा उपलोड कराव्यात? मला काही पानांमध्ये चित्रे वापरायची आहेत. इंग्रजी विकिपीडियातील चित्रे मराठी विकिपीडियात का वापरता येत नाहीत ?
संपादन- मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता परंतु प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे अधिक श्रेयस्कर असते कारण विकिमीडियाकॉमन्समधील संचिका विकिमीडिया/विकिपीडियाच्या सर्व सहप्रकल्पात सर्व भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबुक्स इत्यादीत वापरणे सोपे जाते. अर्थातच विकिमीडियाकॉमन्समधील संचिका मराठी विकिपीडियावरसुद्धा वापरता येतात.
प्रताधिकारित संचिका चढवण्यापूर्वी संबधितांची पूर्वपरवानगी घ्या. लोगोसारख्या चित्रांना प्रताधिकाराची सूचना दर्शविणे अपेक्षित आहे. त्याकरता {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरावा. या साच्यामुळे अशा संचिकांवर योग्य असःई प्रताधिकारदर्शक खूण/सूचना दिसेल आणि त्यांचे वर्गीकरण आपोआपच 'वर्ग:प्रताधिकारित संचिका' या वर्गात होईल. पुढील काळात प्रताधिकारित संचिका चढवताना कृपया या साच्याचा जरूर वापर करावा (आधी चढवलेल्या प्रतधिकारित संचिकांमध्येही हा साचा टाकल्यास उत्तम! :) ).
हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेला आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूर व विकिपीडिया लोगो पहा.
"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ?
संपादनसाचा:प्रताधिकारित संचिका साचाने वर्गीकृत सर्व संचिका वगळणे तो साचा वगळणे आणि व या पुढे Fair Use हे तत्व मराठी विकिपीडियातून अस्विकार्ह ठरवणे प्रस्ताव
- मराठी विकिपीडियन मित्रांनो हा गंभीर पण महत्वाचा विषय आहे.आज पुन्हा एक छायाचित्र एका लेखात "उचित वापर" (फेअर यूझ) या तत्वाखाली जोडलेले पाहिले प्रत्यक्षात ते सरळ सरळ प्रताधिकार कायद्दाचे उल्लंघन ठरते. माझ्या खालील विवेचना बद्दल आपले काय मत आहे ?
- खरेतर हा आक्षेप नोंदवण्यात अंमळ उशीर आधीच झालेला आहे,अपेक्षा हि होती की मराठी जनांपैकी कुणी कायदेतज्ञ उगवेल आणि मार्गदर्शन करेल कारण लंगड्या गायीने मार्गदर्शन करण्यापेक्षा सोनाराने कान टोचणे बरे असते, पण न पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवण्या शिवाय मराठी विकिपीड़ियन्सना अद्दाप तरी पर्याय दिसत नाही.
- काय असावे आणि काय आहे यात बर्याचदा तफावत असते, तशीच तफावत "योग्य उपयोग" या धारणे संदर्भात आहे.
- माझ्या ज्ञानाची मर्यादा इंटरनेटवर उपलब्ध भारतीय प्रताधिकार कायद्दाची जी काही बेअर अॅक्ट आवृत्ती आणि थोडेफार ढोबळ विश्लेषण, भारतातील कडी-कपारीत रहात असणार्यांना भारतीय मातीवर कधी काळी पाऊल ठेवावे लागेल अशा सर्व व्य्क्तींनी भारतातील कायद्दांच्या चष्म्यातून पहावयास हवे याची जाणीव , येथ पर्यंत आहे. (ईंटरनेटवरील उपलब्ध आवृत्ती जुनी असू शकते,शिवाय भारतीय न्यायसंस्थेचे कायदा विषयक विश्लेषण अंतीम असते आणि असे विश्लेषण माझ्या वाचनात नाही याची मी प्रांजळ कबुली देतो.)
- आपण जेव्हा एखादी गोष्ट भारतीय मातीवरून आकाशात(आंतर जालावर) पाठवतो, किंवा भारता बाहेरून पण भारतीय आकाश/मातीवर काही करतो तेव्हा भारतीय कायद्यांच्या परिघात येतो.सर्वर आमेरिकेत आहे का भारतात याने फरक पडत नाही, भारतीय कायदा लागू होतोच.
- मला इंटरनेटवर उपलब्ध झालेल्या बेअर अॅक्ट मध्ये प्रताधिकार विषयक दिलेल्या मर्यादा पुन्हा पुन्हा चाळून(वाचून) पाहिल्या पण भारतीय कायद्दास Fair Dealing हा शब्दप्रयोग आहे Fair Use शब्दप्रयोग नाही,समजा दोन्हीचा अर्थ "योग्य उपयोग" असा जरी धरला तरी भारतीय कायद्दास परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगीचा परिघ मर्यादीत आहे., आपण विकिपीडियावर वापरताना ज्या पद्धतीने "योग्य उपयोग' या शब्द प्रयोग वापरू तो भारतीय प्रताधिकार कायद्या नुसार उपलब्ध मर्यादेत बसत नाही असे माझे साधार मत आहे.[१]
- भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया हि खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते,त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही.विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.
- (एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्दार्थ्यांशिवाय इतर कुणास उघडत नसेल तर काही बंधने शिथील होण्याची शक्यत असू शकेल पण विकिपीडिया या परिघात येणार नाही.विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाईन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथील होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)
- एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात,तसेच बातम्या स्विकारत नाही तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते(कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल मला दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही.
- इंग्रजी विकिपीडिया आमेरिकि कायद्याचा लाभ घेत "योग्य उपयोग" मर्यादीत स्वरूपात स्विकारते पण विकिमीडिया कॉमन्सपण वर उल्लेख केलेल्या प्रमाणे "सर्व देशात सर्व परिस्थितीत" "योग्य उपयोग" लागू होत नाही म्हणून "योग्य उपयोग" हे तत्व संचिका स्विकारताना, मुळीच ग्राह्य धरत नाही. मराठी विकिपीडियावरील बहूसंख्य सदस्य ज्या अर्थी भारतात रहाणार आहेत त्या अर्थी त्यांना भारतीय कायदे लागू होणार आहेत.जरी कायदेशीर जबाबदारी सदस्यांची व्य्क्तीगत असली तरी अनभिज्ञतेने/अनवधानाने सदस्यांकडून शक्य असलेल्या चूका टाळण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स प्रमाणे मराठी विकिपीडियाने देखिल "योग्य उपयोग" हे तत्व अग्राह्य ठरवत या तत्वा खाली नविन संचिका सदस्यांनी टाकू नयेत, टाकल्यास वगळाव्यात,तसेच या तत्वातील उअपयोग केलेल्या सार्या जुन्या संचिका वगळाव्यात असे माझे आग्रहाचे मत आहे.
- माझ्या आक्षेपाची शहानिशा विचार विमर्श करून मते मांडावीत त्या नंतर सुयोग्य अंमलबजावणी करावी हि सादर विनंती
- माहितगार ०७:०५, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)
माझा प्रवेश होत नाही, काय कारण असावे?
संपादन- शक्यता एक : काही वेळा प्रवेश झाला असतो पण कुकीज क्लिअर न केल्या मुळे दिसत नाही एखाद्या नवीन् पानावर संपादन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रवेश झाला आहे किंवा नाही हे लक्षात येईल.
- शक्यता दोन : अर्थात तुमचा प्रवेश् तुम्ही सदस्य नावाने करावयास हवा सदस्य क्रमांकाने नाही
- शक्यता तीन :पासवर्ड विसरला आहात?
- या शिवाय इतर काही प्रॉब्लेम असेल तर एरर मेसेज् यायला हवा तसा येत असेल् तर ती माहिती मदत केंद्रावर देणे
- तसेच नवे खाते बनवून किंवा खात्यात प्रवेश न करताही बहूतेक लेखांचे संपादन करता येते.
संदर्भ कसे द्यावेत
संपादन- पहा: संदर्भीकरण
- १) लेखाच्या तळाशी
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भ यादी}} अशी नोंद आहे याची खात्री करून घ्यावी
- २) संपादन खिडकी सुरू झाल्या नंतर निळ्या मेन्युबारवर डावीकडून सहावी एक अत्यंत छोटी पुस्तकाची खूण दिसेल जीथे तुम्हाला संदर्भ द्यावयाचा आहे तीथे कर्सर ठेऊन त्यावर टिचकी मारा. संदर्भ माहिती/दुवा भरून समाविष्ट करावर टिचकी मारा. <ref>भरलेला संदर्भ मजकुर </ref> असे दिसेल <ref> आणि </ref> च्या मध्ये संदर्भ लिहावेत अथवा दुरुस्त करावेत. लेखाच्या तळाशी संदर्भ आपोआप तयार होणार्या क्रमांका सहीत सहज दिसतो. उदाहरणार्थ <ref>(उदाहरणार्थ )G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff</ref>[१]
- ह्या [२] क्रमांकावर टिचकी मारून पहा.
- कृपया महात्मा गांधी या लेखाचा स्रोत पाहा. त्यात अनेक संदर्भ दिले आहेत.
{{en:Template:Familytree}} हा इंग्रजी विकी वरील साचा मला मराठीत एक दोन ठिकाणी वापरायचा आहे. तो मराठीत कसा आणावा ?
संपादनमी इन्ग्लिश विकीपिडिया मधील लेखांचे मराठीत भाषांतर करु शकतो का?
संपादन- होय, आपण इन्ग्लिश विकिपीडिया मधील आपण आपल्याला आवडलेल्या कोणत्याही लेखांचे मराठीत भाषांतर करून मराठी विकिपिडियास भरीव मदत करू शकता.वर्ग:भाषांतर येथे भाषांतरीत करून हवे असलेल्या लेखांची यादी मिळेल. पहा नमस्कार नेहमीचे प्रश्न,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.
- हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~
आपण आपली स्वत:ची माहीती का नाही देऊ शकत ?
संपादनसंदीप विष्णु सानप (मे १६, इ.स. १९९२; बीड, महाराष्ट्र - हयात) हा मराठी एक नागरीक असून भारतीय एक विद्यार्थी माझे शिक्षण श्री जालिँदर विद्यालय मध्ये झाले.मी कोणी नेता नाही की काही नाही.मला फक्त कविता लिहायला आवडत .तुम्ही म्हणाल येथे फक्त नेत्याची माहीती असते.आपली का नाही देऊ शकत आपण पण हिँन्दुस्थानी आहोत आपल्याला अधिकार आहे.चला देशासाठी काही चागल करुया.
- नमस्कार, संदीप
- एक नवागत सदस्य या नात्याने आपल्या शंके करता आपण मदतकेंद्र निवडले असते तर बरे झाले असते, कारण मदत केंद्रावरील उपलब्ध केलेल्या सहाय्यावर बेतून पुढे सहाय्य पानांची रचना करणे बरे पडते. असो आपल्या शंकेचे उत्तर खालील प्रमाणे,
- विकिपीडिया सर्वसाधारण वेबसाइट नाही. एक ज्ञानकोश आहे.ज्ञानकोशात केवळ नेत्यांसाठी नाही, विश्वकोशीय उल्लेखनीयता असलेल्या कोणत्याही 'अबकड' व्यक्ती अथवा गोष्टीची दखल घेतली जाऊ शकते.पण ज्ञानकोशीय विश्वासार्हता पाळण्याच्या दृष्टीने येथे काही संकेतांचे पालन केले जाते.
- (काही अपवाद वगळता) सहसा इतर जगाने इतर माध्यमातून एखाद्या व्यक्ती/घटना/गोष्टीची दखल घेऊन झाल्याच्या नंतर त्यातील सुसंबद्ध ज्ञानकोशीय माहिती तेवढी संदर्भासहीत ज्ञानकोश स्विकारत असतात.कोणत्याही विषय नसण्याचे बंधन नाही म्हणून विकिपीडिया मुक्त म्हणविला जातो परंतु ज्ञानकोशीय मर्यादांच्या परिघातच.या बद्दल बरेच संकेत आहेत .आपण सावकाश पणे येथील सर्व संकेतांशी अभ्यस्त होउ शकता.
- विकिपीडियावर माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वत:चे अथवा स्वत:बद्दल लेखन करणे करवून घेणे अभिप्रेत नसते.
- आपल्या कविता आणि ज्ञानकोशाच्या परिघा बाहेरील इतर गोष्टी जसे की देशा साठी वगैरे करण्यास इंटरनेटवर इतरत्र बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कडून देशा साठी काही चांगले कार्य अवश्य होउ द्या. आपण नेतेच झाले पाहिजे असे नाही कोणत्याही क्षेत्रात नावारूपाला या.इतर लोकांनी स्वत:हून आपली ज्ञानकोशात दखल घ्यावी एवढे मोठे व्हा.त्या करिता आपणास शूभेच्छा.
- नावारुपाला आणेल हा उद्देश खूप आवश्यक नसेल तर,वर नमुद केल्या प्रमाणे स्वत: विषयीच्या माहितीस खूपसे महत्व देण्याचे टाळले तर आपण विकिपीडियावरील ज्ञानकोशात ज्ञानकोशीय माहितीची भर घालणे हे सुद्धा चांगले कार्यच आहे.हेही लक्षात घेता येइल
- मराठी विकिपीडियावरील वावरा करीता येथील सहाय्य पानांचे वाचन करा. १) विपी:परिचय , २)विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे, ३) विकिपीडिया:मर्यादा#.विश्वकोश संकल्पना, ४) विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी हे सुद्धा अवश्य पहावे.
- पुनश्च आपले मराठी विकिपीडियात स्वागत.
भाषा क्लिष्टता
संपादनIs it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा. can't it be simple and translated in day to day language?
संपादन- येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे,समर्पक आणि चपखल [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा. सहसा शब्द इतर मराठी संकेतस्थळांवर चर्चा झालेले असतात जसे कि टिचकी मारणे हा माऊस ने क्लिक करण्याकरता वापरला जातो.शास्त्रीय शब्द बर्याचदा नवखे असले तरी इंग्रजीतील शास्त्रीय शब्दसुद्धा त्याच्या व्याख्येशी निगडीत असतात ती व्याख्या माहीत होत नाही तो पर्यंत ते शब्दही रूळे पर्यंत नवखेच असतात असा एक मत प्रवाह आहे.परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्वांचा उपयोग अधिक श्रेयस्कर समजला जातो. विकिपीडिया वापरताना विकिसॉफ्टवेअर करिता जे शब्द वापरले गेले आहेत त्यांची व त्यांना कसे बदलावयाचे याची माहिती विकिसंज्ञा लेखात मिळेल.बाकीच्या ठिकाणचे शब्द तुम्ही तुमचेही बदलू शकता. आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.
महाराष्ट्रातील संस्थाविषयी चर्चा पानावर शंका आल्यास काय करावे?
संपादनबर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्या प्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा.
वर्णनाचे वर्णन: कोणते कोशिय कोणते अकोशिय फरक कसा सांगावा ?
संपादन- एका अर्थाने कोश लेखनात लेख विषयाचे वर्णन असतेच, पण सर्व प्रकारच्या वर्णनांना कोशिय म्हणता येत नाही.जसे प्रवास वर्णने आहेत तसेच काही वर्णनात कथात्मकता दिसते. जसे थोरले बाजीराव पेशवे लेखाचे सद्य स्वरूप कथात्मकता आणि रंजन आहेच, अशा लेखन शैलीस विश्वकोशिय म्हणता येते नाहीच पण त्या पलिकडे एखादे दुसरे संपादक काही भर घालू इच्छीत असतील तर नेमके कुठे बदल करू असे होऊन जाईल.
- चंगीझ खान हा लेख सुद्धा ऐतिहासिक व्यक्तीचे चित्रण करते पण यात विश्वकोशिय feel येतो.
- एवढ्या प्रदीर्घ अनुभवाने हा फरक आपल्यातील जाणत्या विकिपीडियन सदस्यांना लक्षात येतोच पण विशेषणे टाकू नका हे मार्गदर्शन जेवढ्या सहज पणे सांगता येते तसे वर्णनात्मक लिहू नये असे सरसकट कसे सांगावे ? विश्वकोशीयतेस मंजूर वर्णन आणि ना मंजूर वर्णन यातील फरक नवागत सदस्यांना कसा एक्सप्लेन करावा हे मला सुचत नाही आहे. कुणी सांगू शकेल ?
- माहितगार १५:०५, २ ऑगस्ट २०१० (UTC)
- वेळोवेळीच्या चर्चांमध्ये हे व इतरही मुद्दे मी तसेच इतर सदस्यांनी मांडलेले आहेत. अजून कोणास काही आठवल्यास भर घालावी.
- विश्वकोष लेखांतून वर्णनात्मक मजकूर पूर्णपणे नाहीसा होणे कठीण आहे पण त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाय --
- पुरावा/संदर्भ नसलेले लिखाण काढून टाकावे.
- लेखकाचे व्यक्तिगत मत असलेली विधाने बदलून किमानपक्षी third-person करावी - बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. पेक्षा चिमाजीअप्पाला बाजीरावाच्या तुलनेचा सेनापती समजले जाते. हे विधान बरे. दुसर्या विधानाला एखाद्या विद्वानाचा संदर्भ देता आला तर अतिउत्तम.
- तुलनात्मक मजकूर/विशेषण लावताना मराठी विकिपीडिया विश्वकोष आहे हे लक्षात ठेवावे. गंगेच्या पात्राला महाभयंकर ओढ आहे. हे एखाद्या ऍमेझोन, नाइल किंवा मिसिसिपी पाहिलेल्या माणसाला नक्कीच चूक वाटणार.
- मोघम वक्तव्ये (generalizations) बदलावी. मारवाडी/कोब्रा/ज्यू व्यक्ती कंजूष असतात. हे बरोबर नाही. मारवाडी/कोब्रा/ज्यू व्यक्तींना सामान्यतः कंजूष समजले जाते. हे ठीक (पण संदर्भांशिवाय बरोबरच असे नाही.)
- व्यक्तिगत/विशिष्ट bias, दृष्टिकोन मजकूराय येऊ देऊ नयेत. स्टालिन/हिटलर/पॉल पॉट हा क्रूरकर्मा होता हे एकांडे विधान लंगडे आहे (जरी जगन्मान्य असले तरीही). स्टालिन/हिटलर/पॉल पॉट यांनी १, २, ३, इ. कृती केल्या.(येथे सविस्तर मजकूर असावा) त्यामुळे त्यांची जगातील क्रूर शासकांमध्ये गणना होते. हे ठीक.
- अभय नातू १७:३८, २ ऑगस्ट २०१० (UTC)