विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
हा काय प्रकल्प आहे?

संपादन

मराठी विकिपीडियातील माहितीत भर पडावी त्यासाठी अनेक प्रयत्नांपैकी एक असा हा उद्योग आहे. यानुसार दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ इतकी होईल.

हा उद्योग कशासाठी? चालली आहे ही वाढ पुरेशी नाही का?

संपादन

नाही. मराठी विकिपीडियातील माहितीवर्धनाचा सध्याचा वेग मंद आहे. ७ कोटीपेक्षा अधिक लोक ही भाषा बोलतात, त्यामानाने या विकिपीडियातील माहिती आत्तापेक्षा कितीतरीपट पाहिजे. केवळ २-३ कोटी भाषिक असलेल्या भाषांच्या विकिपीडियातसुद्धा मराठीच्या अनेकपटीने लेख व माहिती आहे. सगळ्या विकिपीडियांमध्ये लेखांनुसार मराठी विकिपीडियाचा क्रमांक ५८ आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या मानाने हा क्रमांक १५वा आहे. मराठी विकिपीडियावर अंदाजे १५-२० सदस्य (अविरत) कार्यरत आहेत. यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा असला तरी कमीच पडत आहे. यात त्यांना मदत पाहिजे.

आपल्या आसपास पाहिले असता असे आढळते की जर एखादे उद्दिष्ट ठेवले असता माणूस (किंवा जनावरेही) त्यापरीस पोचण्याचे प्रयत्न जास्त जोमाने करतात. या प्रकल्पामागचे कारण हेच आहे.

दिलेले उद्दीष्ट मिळवण्याजोगे आहे?

संपादन

११-११-११ला १,११,१११ लेख तयार असणे हे उद्दीष्ट कठीण असले तरी अशक्य नाहीच नाही. जर १-१-२००८पासूनचा विचार केला तर साधारण १,०९६ दिवसांत अंदाजे ९७,००० नवीन लेख पाहिजेत. म्हणजे रोज ८८-८९ नवीन लेख पाहिजेत. सध्या मराठी विकिपीडियात रोज सरासरी ८-९ लेखांची भर पडते हे पाहिल्यास हे उद्दीष्ट महाकठीण वाटते, परंतु हेही लक्षात घेतले पाहिजे की अवघ्या १ वर्षांपूर्वी ही सरासरी ४-५ लेख होती. जसे लेख वाढतील तसतसे सदस्यही वाढतील व माहितीत भर पडण्याचा वेगही वाढेल. मूरचा नियम, स्नोबॉल परिणाम, इ. अनेक नियम येथे दाखविता येतील परंतु मथितार्थ हाच आहे की निशानचूक माफ, नही माफ नीचुं निशान.

मराठी विकिपीडियातील माहिती वाढविण्याचा हाच एक उपाय आहे का?

संपादन

नाही, इतरही अनेक प्रकल्प, प्रयत्न चालूच असतात, उदा. लेख संपादन स्पर्धा.

या प्रकल्पामुळे लेखांची संख्या तर निश्चितच वाढेल, पण माहिती वाढेल?

संपादन

नाही आणि हो. नुसते लेख तयार करून त्यात माहिती नसली तर त्यांचा उपयोग फारसा नाही. जरी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश लेखांची संख्या वाढविण्याचा असला तरी त्याचा अजून एक परिणाम लेखकांनी माहितीत आपसूक भर घालण्याचाही होईल ही खात्री आहे. शिवाय, काही काळाने या प्रकल्पाची दुय्यम उद्दीष्टेही ठरविण्यात येतील, जसे - मोठ्या पानांपैकी ५,००० पानांची लांबी १०,००० बाइटपेक्षा मोठी असणे, लेखांव्यतिरिक्त पानांची (पुनर्निर्देशने, चर्चा पाने, वर्गपाने, इ) संख्या लेखांच्या तिपटीने असणे, इ.

या प्रकल्पाचा विकास कसा कळणार?

संपादन

दर काही दिवसांनी सांख्यिकी प्रकाशित करण्यात येईल. या पानाच्या शेवटी त्यासाठीचे दुवे असतील.

मला या प्रकल्पाचे प्रबंधन करायला आवडेल. मी काय करू?

संपादन

यासाठी यापानाच्या चर्चापानावर किंवा चावडीवर संदेश ठेवा. सध्याचे प्रबंधक तुमच्याशी संवाद साधतील.

सांख्यिकी

संपादन

हेसुद्धा पहा

संपादन

इतरांनाही सांगायचेय

संपादन