विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण

(विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण या पानावरून पुनर्निर्देशित)

वर्ग सुसूत्रीकरण

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
वर्ग (Category) हे विविध लेखांचे विषयानुरूप वर्गीकरण करण्याकरता पाडलेले विभाग आहेत. मराठी विकिपीडियावरील सर्व वर्गांची यादी येथे दिली आहे. वर्गांचा शाखाविस्तार येथे पाहता येईल.

मराठी विकिपीडियावरील सर्वोच्च वर्ग मूळ हा असून, त्याच्या शाखांमध्ये इतर सर्व वर्ग विभागले आहेत.

अधिक विशेष माहितीकरिता उजवीकडील सुचालन साचातून उपपाने अभ्यासा.

उद्देश संपादन

  • वाचकांना लेख विषयानुरूप सुलभतेने शोधता आणि वाचता येणे.एखादा विषय एका पेक्षा अधिक लेखातून अथवा वाचकाच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या नावाने असेल तर ते त्या विषयास अनुलक्षून असलेल्या वर्गीकरणात किंवा उपवर्गात शोधता येणे.
  • एकाच लेखविषयाची वेगवेगळ्या ठिकाणी अथवा वेगवेगळ्या नावाने होऊ शकणारी पुनरूक्ती टाळणे व नि:संदिग्धीकरणास सहाय्यभूत ठरणे.
  • एकाच विषयास अनुसरून असलेल्या लेखात एकजिनसीपणा आणणे
  • विषय गटानुसार लेखांत लेखन योगदान तसेच मुल्यमापन करू इच्छिणार्‍या व्यक्तींना विषयानुरूप लेख शोधता येणे.
  • एखाद्या विषय गटास/वर्गवारीतील लेखात योगदान करणार्‍या व्यक्तींमध्ये समन्वय साधण्याकरिता विशेष विकिपीडीया प्रकल्प उपलब्ध नसेल तर तसा समन्वय संबधीत वर्गपानाच्या चर्चा पानावरून साधण्याचा प्रयत्न करणे.
  • वर्गवारीतील एखादा लेख प्रमूख लेख असेल तर त्या बद्दल निर्देश करणे.

प्रस्ताव संपादन

आढावा संपादन

दिनांक अवर्गीकृत वर्ग न वापरलेले वर्ग पाहिजे असलेले वर्ग अवर्गीकृत पाने अवर्गीकृत चित्रे
ऑगस्ट, २००९ ३४२ ६७२ ३३२४ ३८४ १,६२४