विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

सुस्वागतम्

सुस्वागतम् !!! मराठी रंगभूमीच्या विकिमोहिमेवर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियावर मराठी रंगभूमीशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

कार्यप्रस्ताव दिनांक २३ मार्च २०१२ (गुढीपाडवा) संपादन

  • उद्दिष्ट: मराठी विकिपीडियावर मराठी रंगभूमीशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. मराठी रंगभूमी इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. हा १५० वर्षाचा रंजक इतिहास मराठी विकिपीडिया वर आणायचा आहे. या प्रकल्पात मध्ये अनेक जण आपल्या परीने काम करू शकतील. याची ढोबळ संकल्पना अशी आहे -
  1. मराठी रंगभूमी, मराठी रंगभूमीचा इतिहास, मराठी रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, अनेक रंगकर्मी अशा अनेकविध विषय तयार करून त्यावर मराठी विपी वर विपुल लिखाण करणे.
  2. विविध लायब्ररी मधील पुस्तके धुंडाळून त्यातील योग्य मजकूर संदर्भ सहित आंत येईल.
  3. माजी नाट्य संमेलनांची संपूर्ण माहिती आणि फोटो मिळवून ते लेखात चढवणे
  4. नाट्य परिषद आणि अनेक संस्थांकडून मिळालेली माहिती सुसूत्रपणे मराठी विकिपीडिया मध्ये टाकणे
  5. मराठी रंगभूमीवर योगदान देणाऱ्या व्यक्तींचे लेख बनवणे
  6. हा प्रकल्प पुढच्या नाट्य संमेलनापर्यंत पूर्ण करून त्याची माहिती सुयोग्य पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवणे.

यात ढोबळ मानाने लेखांसंबंधी खालील निकष पुरे करायचे आहेत :

  1. लेखविषयाबद्दल परिचयात्मक पहिला परिच्छेद खालील उपनिकषांनुसार पुरा करणे.
  2. विषयाचे मराठीतील नाव, मराठीतील अन्य नामभेद, इंग्लिश भाषेतील नाव (काही मराठी भाषकांना इंग्लिश नावे अभ्यासक्रमाद्वारे माहीत असल्यामुळे) नोंदवणे.
  3. लेखाच्या मुख्य विषयाशी संबंधित असलेल्या उपलब्ध लेखांचे विकिदुवे देणे
  4. लेखाच्या मुख्य विषयाशी संबंधित एखादे चित्र/आकृती टाकणे (टाकलीच पाहिजे असे नाही.).
  5. कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
  6. बाह्य दुव्यांचे आणि संदर्भांचे मराठीकरण प्राधान्याने करावे. तसेच बाह्य दुवे आणि संदर्भ नोंदवताना साचा:स्रोत संकेतस्थळ, साचा:स्रोत पुस्तक इत्यादी संदर्भसाच्यांचा वापर करावा.
  • प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)
  • समन्वयक: मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)
  • सहभागी सदस्य: मंदार कुलकर्णी (चर्चा | योगदान)
  • कालावधी: सध्या या विकिप्रकल्पाचा आवाका व सहभागी सदस्य यांतील गुणोत्तर व्यस्त असल्यामुळे तूर्तास बेमुदत कालावधी ठेवावा. अपेक्षा अशी की येत्या नाट्य संमेलनापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. भविष्यात या कार्यप्रस्तावास अन्य सदस्यांचा सहभाग लाभला, तर सहमतीने कालावधी ठरवून येथे नोंदवावा.
  • या आधीच्या मुदतवाढी: सध्या गैरलागू.
  • सद्यस्थिती: काही सदस्य अगदी मनापासून ह्या विषयामध्ये बहुमोल योगदान देत आहेत. त्या सर्वांचा चांगला संगम साधून, एकमेकांना पूरक असे विधायक कार्य यातून घडावे यासाठी सारेजण प्रयत्नात आहोत.

या प्रकल्पाचा समन्वय करण्यासाठीचे हे मध्यवर्ती पान आहे.

आपण काय करू शकता संपादन

  1. नवीन लेख लिहा
  2. भाषांतर करा
  3. शुद्धलेखन चिकित्सा करा
  4. साचे बनवा/ लावा
  5. वर्गीकरण करा
  6. चित्रे लावा
  7. दुवे जोडा, विकिकरण करा
  8. संदर्भ द्या
  9. बाह्य दुवे द्या
  10. उपविभाग वाढवा
  11. सांगकामे चालवा
  • मराठी विकिपीडिया विकिप्रकल्प मराठी रंगभूमी ह्यात सहभागी व्हा ....!

  विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

  विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

  विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक