निरोप

आज "मराठी विकिपीडिया"चा निरोप घेण्याची वेळ आली आहे. कार्यबाहुल्यामुळे गेले काही महीने मला मराठी विकिपीडियावर योगदान देता आले नाही. तसेच गेले वर्षभर माझ्यावर आणि इतर प्रचालकांवर होत असेलेले आरोप आणि शिवराळ भाषा ही व्यथित करणारी आहे, वेळोवेळी योग्य शब्दात प्रचालकांनी उत्तरे देवूनही हे सारे कुठेच थांबत नाहीये. त्यामुळे अत्यंत नाइलाजाने मी मराठी विकिपीडियाचा निरोप घेत आहे. मी गेल्या दोन वर्षात जे काही चांगले काम केले आहे आहे त्याचे सर्व श्रेय अभय, संकल्प, माहीतगार, J , राहुल आणि इतर असंख्य माझ्या मित्रांना देतो. चांगले झाले असेल तर ते केवळ त्यांच्यामुळे आणि चुकीचे झाले असेल तर ते माझ्यामुळे हे मी येथे नमूद करू इच्छितो. "मराठी विकिस्रोत" साठी मी जे थोडेफार योगदान देवू शकलो त्याबद्दल ही आपणा सर्वांचा ऋणी आहे.

यापुढे मी मराठी विकिपीडियावर असणार नाही. मी मेटा वर पुढील कार्यवाही साठी विनंती केली आहे. मराठी विकिपीडियाला परत भविष्यात चांगले दिवस येतील अशी अशा व्यक्त करतो आणि निरोप घेतो. नमस्कार..... Mvkulkarni23 ०१:०१, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)